31 डिसेंबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका भंगार दुकानात मालवाहतूक कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत झोपेत असलेले अखिलेश कुमार सोहनकर (भंगार गोळा करणारे मजूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन मजूर जखमी झाले होते.
ही घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. 3) सायंकाळी त्याच परिसरात हायवा वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक गजानन मुकिंदा शेलार (रा. पाटस) यांचा मृत्यू झाला. यानंतर रविवारी (दि. 4) दुपारी ट्रकने चारचाकी वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोन महिलांना दुखापत होऊन त्या जखमी झाल्या. या घटनांची माहिती पाटस पोलिसांनी दिली.






