World Cancer Day 2025: दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण का वाढत आहे? कशी घ्याल स्वत:ची काळजी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतामध्ये कॅन्सरची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि पुरुषांमध्ये फुफ्फुस आणि तोंडाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या 2023 च्या अहवालानुसार, भारतात 14,96,972 कर्करोगाचे रुग्ण आढळले होते. हा आकाडा चिंतेचे कारण ठरत असून हे दोन्ही कर्करोग पुरुष आणि महिलांमध्ये सामान्य आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागरूकतेचा अभाव आणि उशिरा निदान झाल्यामुळे हे प्रमाण वाढत आहे.
जर कर्करोगाची ही संख्या झपाट्याने अशीच वाढत राहिली तर 2040 पर्यंत भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दोन ते तीनपट पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. आज 4 फेब्रुवारी हा दिवस या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.
कर्करोग झपाट्याने का वाढत आहे?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी 14 लाखांहून अधिक नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळतात. मुख्यतः ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर आणि माउथ कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
कॅन्सर वाढण्याची मुख्य कारणे:
अलीकडच्या काळात माणसाचे जीवनशैली खूप अस्वस्थ बनलेली आहे. कमी शारीरिक श्रम, व्यायामाचा अभाव यामुळे तसेच खाण्या-पिण्याच्या (जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे) चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. याशिवाय तंबाखूचे सेवन, मद्यसेवन यासांरख्या गोष्टींच्या व्यसनाधीन असल्याने देखील तोंडांच्या, पोटाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तसेच बदलते वातावर आणि अनेकदा हा आजार अनुवांशिक देखील असतो.
काय आहेत कॅन्सरची लक्षणे?
यासाठी तुम्ही नियमित वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच वजन नियंत्रित ठेवा यासाठी डॉक्टारांचा योग्य सल्ला घ्या. आरोग्यदायी आहार ठेवा. बाहेरचे, विशेषत: जंक फूडचे खाणे टाळा.
स्तनपान करणे (Breastfeeding)
मुलांना स्तपान करता न येणे हा देखील कर्करोगाचे कारण ठरु शकतो. ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.
फुफ्फुसाचा कॅन्सर (Lung Cancer)
हा कर्करोग स्मोकिंग, प्रदूषण आणि केमिकल्सच्या संपर्कात आल्यामुळे होता. यामुळे यागोष्टींचे व्यसन टाळा आणि अशा लोकांपासून दूर रहा. यामध्ये तुम्हाला सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना अशी लक्षमे जाणवतात.
तोंडाचा कॅन्सर (Mouth Cancer)
भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. याची मुख्य कारणे म्हणजे तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान यांचे सेवन करणे. यामुळे तुमच्या तोंडात गाठ येणे, सतत छाले होणे, रक्तस्त्राव अशी लक्षमे दिसून येतात. यासाठी यांचे सेवन पूर्णपणे टाळा. तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि नियमित तपासणी करा.
कॅन्सर टाळण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, तंबाखू आणि मद्यसेवन टाळणे आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे महत्त्वाचे आहे. 4 फेब्रुवारी ‘वर्ल्ड कॅन्सर डे’ च्या निमित्ताने आपण सर्वांनी कॅन्सरविषयी जागरूक राहण्याचा संकल्प केला पाहिजे.






