विटामिन सी ची कमतरता दूर करण्यासाठी उपाय
निरोगी आरोग्यसाठी, त्वचेसाठी शरीरात मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि इतर सर्व जीवनसत्वे असणे आवश्यक आहे. पण शरीरात कोणत्याही एका जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाली की संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे दैनंदिन आहार, भरपूर पाण्याचे सेवन, व्यायाम, झोप इत्यादी गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर त्वचेमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, पिंपल्स येणे, मुरूम येणे, वांग, बारीक रेषा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शरीरात जीवनसत्वे असणे आवश्यक आहे. पण अनेकदा इतर काही कारणांमुळे त्वचेमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. त्वचेमध्ये झालेले बदल योग्य वेळी लक्षात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. (फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेमध्ये कोलेजन आणि इलास्टिन प्रथिने आढळून येतात. त्यामुळे शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा सैल होऊन जाते. शिवाय त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात कोणत्या जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
संपूर्ण शरीरावरील त्वचा सैल होण्यामागे अनेक कारण आहेत. अनेकदा त्वचेवरील अचानकपणे सुरकुत्या येऊ लागतात. शिवाय त्वचा सैल पडू लागते. वय वाढल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या आणि वांग येण्यास सुरुवात होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून या समस्येमुळे शरीरावर कोणतेही गंभीर परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक महिला या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष न करता त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात कोलेजन आणि इलास्टिन प्रथिनांच्या विघटनामुळे त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते. शिवाय त्वचा सैल आणि सुरकुत्या पडतात.
शरीरामध्ये विटामिन सी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या पडून त्वचा सैल होऊन जाते. शिवाय कोलेजन उत्पादनासाठी विटामिन सी आवश्यक आहे. त्यामुळे शरीरात जर विटामिन सी ची कमतरता निर्माण झाली तर त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. त्वचेतील कोलेजन कमी झाल्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होऊन जाते. तसेच विटामिन सी च्या कमतरतेमुळे शरीरातील पेशी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. विटामिन सी त्वचेचे पेशींच्या नुकसानीपासून वाचवते आणि फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात निर्माण झालेली विटामिन सी ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामध्ये लिंबू, संत्री, बेरी, टोमॅटो, ब्रसेल्स स्प्राउट्स, पालक, आवळा, पुदिना, मुळ्याची पाने इत्यादी पदार्थ खावेत. शिवाय दैनंदिन आहारात लिंबू पाण्याचा समावेश करावा. लिंबू पाण्यात भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे कमी झालेली विटामिनची पातळी भरून निघडते आणि आरोग्याला फायदे होतात.