व्यायाम -डाएट करून वजन कमी होत नसेल तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, महिनाभरात व्हाल स्लिम आणि फिट
वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
वजन वाढण्याची कारणे?
शरीराला गंभीर आजारांची लागण कशामुळे होते?
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत वाढणारे वजन, लठ्ठपणा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. सतत एका जागी बसून राहणे, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचाली न करणे इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीराचे झपाट्याने वजन वाढते आणि आरोग्य बिघडून जाते. पोटावर वाढलेली चरबी सौंदर्यात अडथळे निर्माण करते. याशिवाय वाढत्या लठ्ठपणामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम केला जातो तर कधी सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण न करता हलक्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण असे केल्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो.(फोटो सौजन्य – istock)
वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक महागड्या डाएटचा आहारात समावेश करतात. पण चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनसंस्थेवर अतिरिक्त तणाव येतो आणि खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. त्यामुळे वजन कमी करताना आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे दैनंदिन आहारात सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी आहारात लो-कार्ब्स फूड खावेत. कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी करुन प्रथिनांचे आणि निरोगी फॅट्सचे प्रमाण वाढवल्यास महिनाभरात वजन कमी होऊन तुम्ही स्लिम दिसाल. दैनंदिन आहारात कमी प्रमाणात कर्बोदके खाल्ल्यामुळे पोटावर अनावश्यक चरबीचा थर वाढू लागतो. पोटावर वाढलेल्या चरबीच्या थरामुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात. वजन कमी करताना कायमच उपाशी राहण्याची आवश्यकता नाही. योग्य डाएट, शारीरिक हालचाली आणि शांत झोप घेतल्यास पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी होऊन तुम्ही स्लिम आणि फिट राहाल.
दैनंदिन आहारात कमी कार्ब्सयुक्त पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. भात, चपाती, ब्रेड, पास्ता आणि मिठाईसारखे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्यास वजन फरक दिसून येईल. कार्बयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करताना आहारात कमी कॅलरीज आणि फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. गोड पदार्थांचे सेवन कमी केल्यास वजन सकारात्मक बदल दिसून येतील आणि हळूहळू वजन सुद्धा कमी होईल.
वजन कमी करताना आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पालक, मेथी, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली आणि दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. फायबर जास्त आणि कार्ब्स कमी असलेले पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात. डाळी, कडधान्ये, पनीर, अंडी आणि सोयाबीन इत्यादी प्रथिने युक्त पदार्थ खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. हे पदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारते. बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया आणि चिया सीड्स या पदार्थांमध्ये आरोग्यदायी फॅट्स आढळून येतात.
आंबा, केळी यांसारख्या गोड फळांऐवजी संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी किंवा टरबूज इत्यादी कमी साखर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच भरपूर पाणी प्यावे. नियमित 3 लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहील आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. नियमित शरीर डिटॉक्स होणे फार गरजेचे आहे.






