२०२४ मध्ये जगभरात 'या' गंभीर रोगांनी केला होता कहर
2024 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षभरात अनेक वेगवेगळे विषाणू जगभरात पसरले, ज्यामुळे अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला. या वर्षात अनेक वेगवेगळे आजार जगभरात सगळीकडे पसरले. काही आजारांनी नवे रूप धारण केले तर काही आजार पुन्हा एकदा नव्याने सगळीकडे पसरू लागले. कोरोनानंतर सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. कोरोनासारख्या गंभीर आजाराने संपूर्ण जगाला विळखा घातला होता. यामुळे सर्वच देशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय 2024 मध्ये अनेक नवीन आजार सगळीकडे पसरले. आज आम्ही तुम्हाला 2024 मध्ये कोणत्या आजारांनी कहर केला होता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या आजारांचा शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
2024 मध्ये केरळ आणि दक्षिण भारतामध्ये निपाह व्हायरसची लागण अनेकांना झाल्याचे दिसून आले होते. हा एक गंभीर विषाणू आहे. तसेच वेगाने पसरणारा हा प्राणघातक विषाणू वटवाघुळ आणि डुकरांच्या संपर्कात आल्यामुळे सगळीकडे पसरतो. या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीमुळे हा विषाणू इतरांसुद्धा होतो. निपाह विषाणूची लागण झाल्यानंतर तीव्र ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. हा आजार टाळण्यासाठी वटवाघूळ आणि डुकरांच्या संपर्कात न येता स्वच्छतेची काळजी घ्यावी.
मंकीपॉक्स या आजाराला एम-पॉक्स असे सुद्धा म्हणतात. हा आजार जगभरात सगळीकडे वेगाने पसरला, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली. तसेच हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. य विषाणूची लागण झाल्यानंतर ताप, डोकेदुखी, थकवा, शरीरावर पुरळ येणे आणि लिम्फ नोड्स सूज येणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात. तसेच हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे, संक्रमित पृष्ठभाग आणि दूषित कपड्यांद्वारे सगळीकडे पसरतो.
काही वर्षांआधी संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीने जगाला विळखा घातला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक नुकसान झाले. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा एकदा COVID-19, XBB चा नवीन प्रकार सगळीकडे पसरला होता. या विषाणूची लागण झाल्यानंतर सौम्य ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि दीर्घकाळापर्यंत थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसून आली. तसेच या नव्याने उदयास आणलेल्या विषाणूची लागण कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये अधिक वेगाने दिसून आला.
महाराष्ट्रासह इतर सर्वच देशांमध्ये झिंका विषाणूचे रुग्ण आढळून आले होते. एडिस इजिप्ती डास चावल्यानंतर झिका विषाणूची लागण होते. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. झिका विषाणूची लागण झाल्यानंतर सौम्य ताप, शरीरावर पुरळ उठणे, स्नायू आणि सांधेदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
गालगुंड हा विषाणूजन्य रोग आहे. हा विषाणू लहान मुलांना जास्त प्रभावित करतो. या विषाणूची लागण झाल्यानंतर ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि चेहऱ्याच्या बाजूला सूज येणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. तसेच गालगुंड झालेल्या लहान मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. दिल्ली-एनसीआर, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये गालगुंड विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला आहे.