बाबा रामदेवांनी दिला वजन कमी करण्याचा उत्तम उपाय (फोटो सौजन्य - iStock/Instagram
वजन कमी केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि आजार दूर राहतात. बाबा रामदेव यांनी अशी पद्धत सांगितली आहे, जी केल्यानंतर दररोज १ ते २ किलो वजन कमी होऊ लागेल. यामध्ये तुम्हाला श्वास घेण्याची पद्धत, काय खावे आणि काय खाऊ नये आणि ७ सर्वोत्तम योगासनांबद्दल सांगितले आहे. बाबा रामदेव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले की, असे केल्याने घरी बसून दररोज एक ते दोन किलो वजन कमी करता येते.
यासाठी नक्की कोणती पद्धत वापरायची आणि कोणते योगा करायचे याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तर योग्य पद्धतीने श्वास घेतल्यास तुमचे वजन वाढणार नाही असंही त्यांनी सांगितले. योगगुरूंच्या मते, दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे वजन कमी करण्यास मदत करेल. यासाठी भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, सूर्यभेदी प्राणायाम करा. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर हाताच्या अंगठ्याजवळील बिंदू दाबा आणि मग त्याचा परिणाम पहा असे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
काय खावे आणि काय टाळावे?
कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि टाळावे (फोटो सौजन्य – iStock)
रामदेव बाबांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करता येत नसल्याने लोक निराश होतात. पण जर तुम्ही दीर्घ श्वास घेतला, ७ योगासन केले आणि योग्य आहार घेतला तर तुम्ही सहज सडपातळ होऊ शकता. यासाठी तुम्हाला मीठ, गोड पदार्थ आणि काही धान्ये खाणं बंद करावे लागतील. भोपळ्याचे सूप किंवा भोपळ्याची भाजी खा आणि एक दिवस निर्जला उपवास करा असेही त्यांनी आवर्जून सांगितले, ज्यामुळे आठवड्याभराचं खाल्लेलं अन्न शरीरातून डिटॉक्स होईल.
कोणती योगासनं करावीत आणि पद्धत
कशा पद्धतीने करावी योगा
Weight Loss: रोज 1-1 किलो वजन होईल कमी, Baba Ramdev यांनी पोट सपाट करण्यासाठी दिला जबरदस्त उपाय
पहा व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.