फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित योगासने
जीवनशैलीमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नियमित पौष्टिक आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम फुफ्फुस करतात. त्यामुळे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य चांगले असणे फार महत्वाचे आहे. फुफ्फुसांच्या आजरांचे निदान झाल्यानंतर अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवतात. फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे दिसून लागल्यानंतर तात्काळ डॉक्टरांकडे जावे. छातीत दुखणे, श्वास लागणे, श्वास घेतांना आवाज येणे, खोकल्यासोबत रक्त येणे इत्यादी गंभीर लक्षणे जाणवू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मुंबईकरांनो सावधान! डेंग्यू, गॅस्ट्रो, मलेरियासह स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, आकडेवारी पाहून बसेल धक्का
कपालभाती हा एक प्राणायामाचा प्रकार असून फुफ्फुसाला मजबुत आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.कपालभाती हा श्वासोच्छवाश्वासाचा व्यायाम प्रकार आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित कपालभाती व्यायाम केल्याने श्वसनासंबंधित समस्या दूर होतात. तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक कपालभाती व्यायाम करतात.
फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित योगासने
सकाळी उठल्यानंतर नियमित नौकासन करावे. यामुळे फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तसेच स्नासू, पचन, रक्ताभिसरण सुधारून शरीराचे कार्य सुरळीत होते.
फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित योगासने
फुफ्फसांचे आरोग्य बिघडू नये म्हणून सकाळी उठल्यानंतर भुजंगासन करावे. यामुळे शरीराला जास्त ऑक्सिजन मिळते. ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी भुजंगासन करावे. यामुळे स्नायूचे दुखणे कमी होते.
फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित योगासने
सकाळी उठल्यानंतर नियमित त्रिकोणासन केल्यास फुफ्फुसांचे आरोग्य सुधारेल. यामुळे मज्जासंस्था सक्रिय राहते. हे आसन केल्यामुळे फुफ्फुसाशिवाय शरीराचा खालचा भाग आणि पाठीचा कणा निरोगी राहतो.