मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी (10 Minutes Extended) वाढून मिळणार आहे. शिक्षण मंडळाच्या या निर्णयाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
दहावी, बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी वाचनासाठी यापूर्वी दिल्या जात होत्या. याचा फायदा काही कॉपीबहाद्दर घेत असल्याचे समोर आले होते. त्यात कॉपीच्या काही घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी, अशा प्रकारची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात होती. त्यानंतर आता ही मागणी मान्य करण्यात आली असून, बोर्ड पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक बोर्डाकडून जारी करण्यात आले आहे.
दहा मिनिटे बोर्डाने वाढवून देण्याची मागणी
यापूर्वी बोर्डाने दहा मिनिटे आधी देण्याचा नियम यावर्षीपासूनच रद्द केला. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता शासनाने या मागणीवर गांभीर्याने विचार केला असून, दहा मिनिटे वाढवून दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.