नागपूर : एका दहावीतील मुलीचे चॅटिंग आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन मुलीचे शोषण करणाऱ्या आरोपीला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत हंसराज खोब्रागडे (वय 21) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.
पीडित मुलगी ही दहावीची विद्यार्थिनी आहे. तिची अनिकेतशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोघांमध्ये मैत्री होऊन लवकरच त्याचे रुपांतर प्रेम संबंधात झाले. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. दोघांमधील चॅटिंग आई-वडिलांना दाखविण्याची धमकी देऊन अनिकेत पीडितेचे लैंगिक शोषण करू लागला.
दरम्यान, दहावीची परीक्षा तोंडावर आल्याने पीडिता अभ्यासाला गेली होती. गेल्या महिन्याभरापासून वेगळ्या खोलीत अभ्यास करायची. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या खोलीतील लाईट पहाटेपर्यंत सुरू दिसत होता. परीक्षेचा अभ्यास करत असल्याचा समज करून पालक तिच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण करत नव्हते.
दरवाजा उघडला अन्…
27 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 2 वाजता आई पाणी पिण्यासाठी झोपेतून उठली. तिला पीडितेच्या खोलीच दरवाजा अर्धवट उघडा दिसला. मुलगी खूप उशिरापर्यंत अभ्यास करत असल्यामुळे तिने खोलीत डोकावून बघितले. तिच्या आईला धक्काच बसला. मुलगी अनिकेतसोबत नको त्या अवस्थेत दिसली. तिने लगेच घरातील झाडू घेतला आणि अनिकेतची चांगली धुलाई केली.
काही वेळातच शेजारी आणि कुटुंबीय जमले त्यांनी अनिकेतला पकडून यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्ह नोंदवून अनिकेतला अटक केली.