Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे पंढरपुरात ‘अन्नत्याग आंदोलन’ 

Maharashtra Breaking News- रोहित पवार यांनी काल, १२ जूनपासून पंढरपूरच्या पवित्र भूमीत हे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी व्हावा, बँकांकडून होणारी अडवणूक थांबावी आणि सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 13, 2026 | 11:50 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 13 Jun 2026 11:50 AM (IST)

    13 Jun 2026 11:50 AM (IST)

    आजोबाच बनला हैवान! नातीचं वारंवार लैंगिक शोषण; अश्लील व्हिडिओ दाखवत...

    ग्वालियरमध्ये 60 वर्षीय आजोबानेच आपल्या अल्पवयीन नातीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी तिला अश्लील व्हिडिओ दाखवत चुकीचा स्पर्श करत होता. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार आहे.

  • 13 Jun 2026 11:40 AM (IST)

    13 Jun 2026 11:40 AM (IST)

    इराण कनेक्शन की अमेरिकेचा हलगर्जीपणा? 3 भारतीय खलाशांचा मृत्यूवर जयशंकर यांनी रुबिओ यांना फटकारले

    आंतरराष्ट्रीय सागरी सीमांच्या सुरक्षेवरून आणि आखाती देशांमधील लष्करी हालचालींवरून भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील राजनैतिक तणाव आता कमालीचा वाढला आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ आंतरराष्ट्रीय जलमार्गामध्ये अमेरिकेच्या नौदलाने (US Navy) केलेल्या एका वादग्रस्त कारवाईदरम्यान तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी आणि गंभीर घटनेमुळे संपूर्ण भारतामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, भारत सरकारने या मुद्द्यावर थेट अमेरिकेला आंतरराष्ट्रीय नियमांची आठवण करून देत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • 13 Jun 2026 11:30 AM (IST)

    13 Jun 2026 11:30 AM (IST)

    मानवी इतिहासाची पाने बदलणार! ग्रीसमध्ये सापडली 4 लाख 30 हजार वर्षे जुनी लाकडी अवजारे

    ग्रीसमधील मेगालोपोलिस (Greece, Megalopolis) खोऱ्यातील प्रसिद्ध ‘मॅराथुसा १’ (Marathousa 1) या पुरातत्व स्थळावर शास्त्रज्ञांना तब्बल ४ लाख ३० हजार वर्षे जुनी हाताने वापरली जाणारी लाकडी अवजारे सापडली आहेत. जागतिक विज्ञान जगतात या शोधामुळे प्रचंड खळबळ उडाली असून, मानवाच्या प्राचीन तंत्रज्ञानाचा हा सर्वात जुना आणि जिवंत पुरावा ठरला आहे.

  • 13 Jun 2026 11:20 AM (IST)

    13 Jun 2026 11:20 AM (IST)

    पालिका शिक्षण विभागाचा नवा उपक्रम; शैक्षणिक वर्षात सायन्स सोमवार अभ्यासक्रमात दाखल!

    महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘गणित गुरुवार’ उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. यासोबतच आता या शैक्षणिक वर्षापासून ‘सायन्य सोमवार’ हा उपक्रम सुरु करण्याचा पालिका शिक्षण विभागाचा मानस आहे. येत्या काही दिवसात हा उपक्रम अभ्यासक्रमात दाखल होणार आहे.

  • 13 Jun 2026 11:15 AM (IST)

    13 Jun 2026 11:15 AM (IST)

    भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज पहिले घमासान, कुठे आणि कधी पाहता येणार Live Streaming

    भारतीय क्रिकेट संघ आज अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करत आहे. या मालिकेद्वारे संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाची तयारी करणार आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या सामन्यासाठीच्या तंदुरुस्तीची कसोटी लागणार आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित आयपीएलमधील पाच सामने खेळू शकला नाही. दुखापतीतून परतल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण केले नाही. ५० षटकांच्या सामन्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून रोहित आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.

  • 13 Jun 2026 11:05 AM (IST)

    13 Jun 2026 11:05 AM (IST)

    ‘माझी वाट पाहू नका…’ लंडनमधून लेकाचा शेवटचा फोन; लातूरच्या तरुणाने गळफास घेत संपवलं जीवन

    लातूरमधील हनमंत पाटील हे लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. कौटुंबिक वाद, पत्नीने दाखल केलेला 2 कोटींचा दावा आणि मानसिक तणावामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना केलेल्या शेवटच्या फोनमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • 13 Jun 2026 10:40 AM (IST)

    13 Jun 2026 10:40 AM (IST)

    बेस्टला १,०६० कोटींच्या अनुदानाला ब्रेक

    मुंबईची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या बेस्ट या परिवहन सेवेला मुंबई मनपाकडून मिळणाऱ्या आर्थिक अनुदानावर स्थायी समितीने स्थगिती दिली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी निर्देश दिले आहेत की, यापूर्वी मंजूर झालेले १०० कोटींचे अनुदान कोठे आणि कोणत्या उद्देशासाठी वापरले गेले, याची सविस्तर माहिती सादर केल्यानंतरच २०२६-२७ या आर्थिक वर्षांसाठी नवीन अनुदान मंजूर केले जाईल. शुक्रवारी महानगरपालिका मुख्यालयात स्थायी समितीची बैठक झाली. समितीसमोर २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी बेस्ट वीजपुरवठा आणि चाहतूक उपक्रमाला महानगरपालिकेकडून १,०६० कोटींच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत पाठवला.

  • 13 Jun 2026 10:30 AM (IST)

    13 Jun 2026 10:30 AM (IST)

    कात्रज दूध संघाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू

    कात्रज दूध संघाच्या कारभाराबाबत दाखल झालेल्या तक्रारींमध्ये अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. अस्तित्वात नसलेल्या किंवा निष्क्रय दूध संस्थांच्या नावावर दूध संकलन दाखविण्यात आले का, वाहतूक खर्चात गैरव्यवहार झाला का आणि सभासदत्व देताना नियम व उपविधी डावलण्यात आले का, याची सखोल चौकशी होणार आहे.

  • 13 Jun 2026 10:15 AM (IST)

    13 Jun 2026 10:15 AM (IST)

    BJP मध्ये सामील व्हायला गेलेल्या TMC नेत्याची हकालपट्टी, Video Viral

    व्हिडिओमध्ये तृणमूल काँग्रेसचा एक नेता पक्षांतरासाठी भाजपमध्ये सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यालयात गेल्याचे दिसते जिथे हिरव्या रंगाने त्याचे स्वागत करण्यात आले. तुम्हाला वाटेल की, नेत्याने भाजपमध्ये सामील होणे यात नवीन काही नाही. परंतु व्हिडिओत काही भलतेच घडताना दिसले. भाजप कार्यकर्त्यांनी TMC च्या नेत्याला हिरवा रंग लावला खरा पण या रंगासहच त्याला पार्टीत सामील न करताच कार्यालयातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • 13 Jun 2026 10:05 AM (IST)

    13 Jun 2026 10:05 AM (IST)

    पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या; TCS मधील तिघांवर गुन्हा

    पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडीमधून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका आयटी अभियंत्याने २ पानांचा सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने कामाच्या ठिकाणी रिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि एका मित्राकडून मिळणारा होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून ही घटना २ जून रोजी घडली.

  • 13 Jun 2026 09:55 AM (IST)

    13 Jun 2026 09:55 AM (IST)

    30 नोव्हेंबरपासून या iPhone वर बंद होणार WhatsApp सपोर्ट

    तुम्ही देखील एखाद्या जुन्या आयफोन मॉडेलचा वापर करत आहात का? तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. टेक कंपनी मेटाने घोषणा केली आहे की, 30 नोव्हेंबरपासून काही आयफोन आणि आयपॅड्सवर व्हॉट्सॲप सपोर्ट बंद केला जाणार आहे. या आयफोन आणि आयपॅड यूजर्सकडे व्हॉट्सॲप सपोर्ट सुरु ठेवण्यासाठी iOS 15.5 किंवा त्यानंतरचे वर्जन आणि iPadOS 15.5 किंवा त्यानंतरचे वर्जन असणं आवश्यक आहे. अ‍ॅपलच्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या डिव्हाईसचे यूजर्स जोपर्यंत त्यांचे डिव्हाईस अपडेट करत नाहीत, त्यांना व्हॉट्सॲप सपोर्ट मिळणार नाही.

  • 13 Jun 2026 09:50 AM (IST)

    13 Jun 2026 09:50 AM (IST)

    लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच

    जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Lenovo ने चीनमध्ये त्यांच्या योगा प्रोडक्ट लाइनअपमधील सर्वात स्वस्त मेंबर म्हणून एक नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने लेनोवो योगा ट्रू वायरलेस नॉइज कॅन्सलिंग ईअरबड्स चीनमध्ये लाँच केले आहेत. हे नवीन ट्रू वायरलेस स्टीरियो ईयरफोन्स 40dB पर्यंत अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशन (ANC), 12.2mm डायनामिक ड्राइवर्स आणि डुअल-डिवाइस कनेक्टिविटी सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. लेनोवोने इन्स्टंट पेअरिंग आणि सॉफ्टवेअर-आधारित नियंत्रणांद्वारे या ईअरबड्सना आपल्या ‘योगा पीसी’ इकोसिस्टममध्ये देखील समाविष्ट केले आहे.

  • 13 Jun 2026 09:45 AM (IST)

    13 Jun 2026 09:45 AM (IST)

    चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक

    भारतात 13 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,859 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,621 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,145 रुपये आहे. भारतात 13 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,36,210 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,590 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,450 रुपये आहे. भारतात 13 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 260.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,60,100 रुपये आहे.

  • 13 Jun 2026 09:40 AM (IST)

    13 Jun 2026 09:40 AM (IST)

    आखाती युद्धाचे सावट: कॅन आणि बॅरलमध्ये डिझेल मिळणार की नाही? 

    पुणे: मध्य-पूर्वेतील (Middle East) वाढत्या लष्करी संघर्षामुळे आणि युद्धाच्या भडक्यामुळे जागतिक इंधन बाजारासह देशांतर्गत समीकरणातही मोठे बदल होऊ लागले आहेत.  नव्या नियमानुसार, पेट्रोल पंपांवरून आता ग्राहकांना २०० लीटरपर्यंत पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येणार आहे. मात्र, यासाठी केंद्र सरकारने एक मोठी अट घातली आहे. हे इंधन उघड्या किंवा सामान्य कॅन आणि बॅरलमध्ये न देता, केवळ 'पेसो' (PESO - Petroleum and Explosives Safety Organization) कडून मान्यताप्राप्त (Certified) कंटेनर किंवा ड्रममध्येच दिले जावे, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

  • 13 Jun 2026 09:36 AM (IST)

    13 Jun 2026 09:36 AM (IST)

    Maharashtra Monsoon El Nino Delay: महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास खोळंबला: 'एल निनो'च्या संकटामुळे प्रगती मंदावली 

    Maharashtra Monsoon El Nino Delay मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत हजेरी लावल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास आता अचानक मंदावला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस (Monsoon) कोकणातील हरणे-दापोली परिसरापर्यंत पोहोचला आहे, मात्र पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल हवामान नसल्यामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. परिणामी, मुंबई आणि परिसरात तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला असून नागरिक कमालीच्या उकाड्याने त्रस्त झाले आहेत.

    वाढत्या 'एल निनो'चे नवे संकट भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा कणा मानल्या जाणाऱ्या मान्सूनच्या वाटेत आता 'एल निनो'चे (El Nino) नवे संकट उभे ठाकले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरात 'एल निनो'ची ताकद पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

  • 13 Jun 2026 09:32 AM (IST)

    13 Jun 2026 09:32 AM (IST)

    शेतकऱ्यांचा मित्र मृग किडा नामशेष होण्याच्या मार्गावर; रासायनिक शेतीमुळे अस्तित्व धोक्यात

    देहूगांव : मृग नक्षत्राच्या आगमनासोबतच ग्रामीण भागात दिसणारा लाल रंगाचा मखमली मृग किडा अर्थात ‘इंद्रगोप’ हा शेतकऱ्यांचा नैसर्गिक मित्र मानला जातो. मात्र रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा वाढता व अतिरेकी वापर यामुळे हा उपयुक्त किडा आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून, मृग नक्षत्राला सुरुवात होऊनही मृग किडा दिसेनासा झाला आहे. वाचा सविस्तर-

  • 13 Jun 2026 09:23 AM (IST)

    13 Jun 2026 09:23 AM (IST)

    गर्भपातामुळे नोकरी जाण्याची महिलांमध्ये भीती! ७.८ कोटी नोकरदार महिलांची चिंता

    एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे की, अंदाजे ७८ दशलक्ष भारतीय महिलांना गर्भपाताची माहिती दिल्यास नोकरी जाण्याची किंवा करिअरवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती वाटते. दरम्यान, ८० दशलक्ष महिला सार्वजनिक टीकेच्या भीतीने गप्प राहतात. गर्भपातानंतर जर कंपनी मालकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही, तर ७ कोटी भारतीय महिला नोकरी सोडण्याचा विचार करतात. हे संशोधन क्वेस्ट ग्लोबलने यूगव्हच्या सहकार्याने केले आहे. या संशोधनातून गर्भपात ही कार्यक्षेत्रातील एक मोठी समस्या असल्याचे समोर आले आहे.

  • 13 Jun 2026 09:18 AM (IST)

    13 Jun 2026 09:18 AM (IST)

    Maharashtra Three Language: नव्या शैक्षणिक वर्षात 'त्रिभाषा सूत्र' नाही; तिसरी ते आठवीचे वेळापत्रक जाहीर 

    Maharashtra Three Language: आगामी १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात (Academic Year 2026-27) 'त्रिभाषा सूत्रा'ची (Three Language Formula Maharashtra) अंमलबजावणी होणार नसल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. राज्य शालेय शिक्षण विभागाकडून इयत्ता तिसरी ते आठवीसाठी विषय योजना, शालेय कामाचे दिवस, विषयनिहाय तासिकांची विभागणी आणि शालेय वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले असून, यात त्रिभाषा सूत्राचा समावेश करण्यात आलेला नाही.

     

Maharashtra to National And International Breaking News:

Rohit Pawar Protest Pandharpur: राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) आणि कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले ‘अन्नत्याग आंदोलन’ आज (१३ जून) दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही रोहित पवार आपल्या मागण्यांवर ठाम असून, त्यांनी महायुती सरकारला आक्रमक इशारा दिला आहे.

 

Web Title: 13th june2026 live breaking news marathi maharashtra politics national international war politics sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra news
  • Mumbai News
  • national news

संबंधित बातम्या

Mumbai News: नाले स्वच्छतेसाठी १५ कोटी रुपये! प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी; यंत्र देखभालीसाठी कंत्राट का?
1

Mumbai News: नाले स्वच्छतेसाठी १५ कोटी रुपये! प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी; यंत्र देखभालीसाठी कंत्राट का?

BMC Education: पालिका शिक्षण विभागाचा नवा उपक्रम; शैक्षणिक वर्षात सायन्स सोमवार अभ्यासक्रमात दाखल!
2

BMC Education: पालिका शिक्षण विभागाचा नवा उपक्रम; शैक्षणिक वर्षात सायन्स सोमवार अभ्यासक्रमात दाखल!

Tukaram Mundhe Transfer:  तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला थेट दुग्धाभिषेक! बदली न करण्यासाठी मंगळवेढ्यातील जनता रस्त्यावर
3

Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला थेट दुग्धाभिषेक! बदली न करण्यासाठी मंगळवेढ्यातील जनता रस्त्यावर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार, दिल्लीत घडामोडींना वेग
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार, दिल्लीत घडामोडींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.