Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
Maharashtra Weather Alert: राज्यात सध्या काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली तरी, काही ठिकाणी पावसाचा जोर अद्याप कायम आहे. खास बाब म्हणाजे श्रावण मास सुरू झाल्यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभरात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण आता पुन्हा एकदा हवामान विभागाने आज राज्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
17 Aug 2026 06:30 PM (IST)
17 Aug 2026 06:25 PM (IST)
17 Aug 2026 06:20 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारकडून दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आली आहे. तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
17 Aug 2026 06:15 PM (IST)
Gen Z Financial Crisis : झुरळ या एका शब्दावरुन उभं राहिलेलं आंदोलनाने जंतरमंतर गाजवलं. पण हीच ती जेन झी ( Gen Z Financial Crisis ) आहे का? जिच्या समोर आलेल्या सवयी त्यांना महागाता पडू शकता. आजकाल महागडा फोन, ब्रँडेड कपडे, गॅजेट्स किंवा सहलीसाठी बँक बॅलन्सची वाट पाहण्याची गरज नसते. ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’, क्रेडिट कार्ड आणि लहान वैयक्तिक कर्जांमुळे तरुणांसाठी खरेदी करणे सोपे झालं आहे. एकेकाळी कर्ज ही अत्यंत गरजेची बाब मानली जात होती, पण आता जीवनशैली आणि दैनंदिन खर्चांसाठी कर्जाचा वापर वाढत आहे. विशेषतः Gen Z कमी वयातच क्रेडिट प्रणालीचा भाग बनत आहे.
17 Aug 2026 06:06 PM (IST)
India Vs Sri Lanka 1st Test Match Live Updates: सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन टेस्ट सिरिजमधील पहिला सामना सध्या खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून ४६२ रन्सचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी देखील आपले शानदार प्रदर्शन दाखवले आहे. श्रीलंकेचा संघ २८४ वर ऑल आउट करण्यात भारतीय संघाला यश आले आहे. भारताकडे १७८ रन्सची आघाडी आहे.
17 Aug 2026 06:06 PM (IST)
कर्जत: कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या पाषाणे गावातील नवीन वसाहतीमधील गॅलक्सी गृहसंकुलात तब्बल ११ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा हा भला मोठा अजगर इमारतीच्या तळमजल्यावर दिसल्यानंतर काही काळ रहिवाशांची मोठी धावपळ झाली.
17 Aug 2026 05:58 PM (IST)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वेळे ढेण ता. जावली येथील प्रकल्पग्रस्तांचे जमीन व आर्थिक मोबदला आदी प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करा. आलवडी ता. सातारा येथील धोकादायक घरांचे पुनर्वसन भूस्खलन होणार नाही अशा ठिकाणी झाले पाहिजे, याबाबतही तातडीने शासकीय सोपस्कार पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
17 Aug 2026 05:47 PM (IST)
आफ्रिका खंडातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक मानल्या जाणाऱ्या ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ प्रदेशात एक मोठी भू-राजकीय घडामोड समोर आली आहे. आफ्रिकन देश सोमालिया अलीकडच्या काळात भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा (Pakistan News) एक प्रमुख सामरिक भागीदार म्हणून उदयास आला आहे. ४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि सोमालिया यांच्यात एका द्विपक्षीय संरक्षण सहकार्य करारावर औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार दोन्ही देश दहशतवादविरोधी कारवाया, लष्करी प्रशिक्षण, लष्करी ज्ञान व अनुभवाची देवाणघेवाण आणि संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. इतकेच नव्हे तर, सोमालियाने पाकिस्तानच्या जेएफ-१७ (JF-17) या लढाऊ विमानांच्या खरेदीतही मोठा रस दाखवला आहे. या करारानंतर अवघ्या तीन दिवसांत पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांनी मक्का संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केल्याने या संपूर्ण घडामोडींचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
17 Aug 2026 05:35 PM (IST)
हमास ने इस्रायल वर केलेला हल्ला यावर इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला चढवला . त्यानंतर मध्य पूर्वेत जे युद्धाचे तांडव सुरु झाले आहे . ते दिवसेंदिवस वाढत जात आता इराण , अरब राष्ट्र , इराण समर्थक राष्ट्र हुती , इराक , लेबनॉन , अशे सगळेच यात क्रमाक्रमाने ओढले गेले आहेत. आता हे युद्ध थांबायचे नाव घेत नसतानाच IRGC च्या वरिष्ठांकडून २०२९ पर्यंत युद्ध खेचले जाण्याचा इशारा आलेला आहे .
17 Aug 2026 05:22 PM (IST)
नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजीटल अरेस्ट’च्या सायबर नावाखाली तब्बल २ कोटी रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्यीय भामट्यांचा बुलढाणा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली, सुमारे ५२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल व रक्कम गोठवण्यात यश आले.
17 Aug 2026 05:10 PM (IST)
भाजपच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. पक्षाने आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली असून, या फेरबदलात महाराष्ट्राला विशेष प्रतिनिधित्व मिळाले आहे. केंद्रातील राजकीय घडामोडी आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनेतील या बदलांकडेही महत्त्वाने पाहिले जात आहे.नवीन कार्यकारिणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. या कार्यकारिणीत विविध राज्यांतील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
17 Aug 2026 04:57 PM (IST)
मराठा समाजातील मुलींविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींविषयी लज्जास्पद आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केला. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
17 Aug 2026 04:47 PM (IST)
मुंबईच्या चर्चगेट परिसरातील आयकर विभागाच्या कार्यालयाच्या (Income Tax Office Fire) सात मजली इमारतीत सोमवारी (17 ऑगस्ट 2026) दुपारी आग लागल्याने खळबळ उडाली. दुपारी सुमारे २.०१ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर इमारतीत पसरला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी चार फायर इंजिनसह अन्य अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
17 Aug 2026 04:37 PM (IST)
फुटबॉलच्या जगातील पाच वेळा बॅलोन डी’ओर विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या निवृत्तीबद्दल सर्वात मोठा संकेत दिला आहे. या पोर्तुगीज दिग्गज फुटबॉलपटूने म्हटले आहे की, चालू हंगाम हा एक खेळाडू म्हणून त्याचे शेवटचे वर्ष असू शकते. ४१ वर्षीय रोनाल्डोचा सध्या सौदी प्रो- लीग क्लबच्या अल नासरसोबत जून २०२७ पर्यंत करार आहे. जरी त्याने भूतकाळात अनेक वेळा आपली खेळाडू कारकीर्द संपत आल्याचे मान्य केले असले, तरी त्याने निवृत्तीची कोणतीही विशिष्ट तारीख कधीही दिली नव्हती. आता, ‘वोग’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, हे कदाचित फुटबॉलमधील त्याचे शेवटचे वर्ष आहे आणि त्याला एक महान वारसा मागे ठेवायचा आहे.
17 Aug 2026 04:27 PM (IST)
इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र आणि भयानक वळण घेत आहे. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत इस्रायलचे अतिउजवे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्विर (Itamar Ben-Gvir) यांनी एक अत्यंत चिथावणीखोर आणि वादग्रस्त विधान केले आहे. गाझामध्ये दररोज रात्री किमान ३० ते ४० लोकांना लक्ष्य करून ठार केले पाहिजे, अशी प्रक्षोभक मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे केवळ इस्रायलच्या राजकारणातच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
17 Aug 2026 04:17 PM (IST)
महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, SIR प्रक्रियेत मोठ्या संख्येने मतदारांच्या नोंदी प्रभावित होण्याची शक्यता आहे. अशा मतदारांना पुढे फॉर्म 6 भरून पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार असल्याच्या मुद्द्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार यांच्या मते, फॉर्म 6 हा नियमितपणे वापरला जाणारा अर्ज आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात त्याच्या वापराबाबत अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
17 Aug 2026 04:07 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे या पदासाठी सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
17 Aug 2026 04:00 PM (IST)
मुंबईतल्या आयकर भवनला आग
तळमजल्यावर लागली आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल
17 Aug 2026 03:55 PM (IST)
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावालांकडून राजीनाम्याची घोषणा... पूनावालांचं भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांना पत्र,निर्णयामागे आर्थिक आणि वैयक्तिक कारण असल्याची माहिती.. यापूर्वी ३० जुलै रोजी राजीनामा दिला होता, परंतु पक्षाने तो स्वीकारला नव्हता.
17 Aug 2026 03:45 PM (IST)
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना, शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर थेट व उपरोधिक भाष्य करणारा एक संदेश सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या बसवर लावण्यात आलेल्या फलकाद्वारे रस्त्यांवरील खड्डे, वारंवार होणारी रस्त्यांची दुरुस्ती व त्याभोवती निर्माण झालेल्या व्यवस्थेवरच खोचक प्रश्न मजकुरात उपस्थित करण्यात आले आहेत.
17 Aug 2026 03:30 PM (IST)
चर्चगेटजवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतमध्ये अडकलेल्या २ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
17 Aug 2026 03:15 PM (IST)
Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (17 ऑगस्ट 2026) नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांची आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना दिली.
17 Aug 2026 03:01 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर : तिरंगा रॅलीच्या गर्दीतून भरवेगाने आलेला महानगरपालिकेचा पाणी टँकर थांबविल्याच्या रागातून चालकाने नगरसेवकाला शिवीगाळ करत टँकर अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. टँकर अंगावर येताच नगरसेवक बाजूला सरकल्याने ते बचावले आहेत. रॅलीतील नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी दुपारी २.१० वाजेच्या सुमारास छञपती महाविद्यालयाजवळ घडली आहे.
17 Aug 2026 02:59 PM (IST)
CAGच्या तपासणीत देशातील 89 टक्के रेल्वे स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता आढळली. महाराष्ट्रातील सात स्थानकांचाही यात समावेश आहे. पिण्याचे पाणी, शौचालये, बाके, पंखे, वॉटर कूलर, दिव्यांग सुविधा आणि प्लॅटफॉर्मवरील छताचा अभाव असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
17 Aug 2026 02:50 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. संबंधित वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी मराठा समाजाच्या लेकींबाबत बोलणाऱ्यांना इशारा दिला. आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे सांगत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्याने संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
17 Aug 2026 02:40 PM (IST)
गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाजे म्हणाले, तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते आपल्याला मान्य करावे लागेल. त्यांनी सर्वसामान्य लोकांचा विचार करून काम करावं. आमचं त्यामध्ये हस्तक्षेप असल्याचं काही कारण नाही.
17 Aug 2026 02:29 PM (IST)
अहिल्यानगर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नेवासा, सुपा व पारनेर पोलिस ठाण्यात सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत वेगवेगळ्या सहा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईत 16 आरोपीविरूध्द 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात आरोपींकडून 1 लाख 37 हजार 580 रुपयांचा मावा, पानमसाला व सुगंधीत तंबाखु असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
17 Aug 2026 02:20 PM (IST)
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2004 ते 2014 या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षात होणारी घुसमट मी जवळून पाहिली होती, असे म्हटलं आहे. खासदार शेट्टी हे परळी येथे प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
17 Aug 2026 02:09 PM (IST)
शरद पवारांनी NDAमध्ये सहभागी होण्याच्या चर्चाना पूर्णविराम देत आपण NDAच्या विरोधातच असल्याचे स्पष्ट केले. नरेंद्र मोदींसोबत खासदारांची भेट झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने NDAमध्ये जाण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
17 Aug 2026 02:05 PM (IST)
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जूनमध्ये घेतलेल्या UGC-NET परीक्षेच्या तीन विषयांचे पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकामध्ये अनेक गंभीर उणिवा आणि गडबडी आढळून आल्या होत्या, त्यानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्या विषयांची पुनर्रिक्षा होणार आहे, त्यांची नावे इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र अशी आहेत. NTA ने ‘एक्स’ वर पोस्ट लिहून याबाबतची घोषणा केली आहे.
17 Aug 2026 02:00 PM (IST)
महिलांच्या द हंड्रेडंच्या अंतिम सामन्यात ट्रेंट रॉकेट्स आणि सनरायझर्स लीड्स आमनेसामने आले. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने सनरायझर्स लीड्सचा ८ विकेट्सने पराभव केला. ट्रेंट रॉकेट्सी कर्णधार अॅशले गार्डनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना, रॉकेट्सने सनरायझर्स लीड्सला केवळ ९१ धावांवर गुंडाळले. त्यानंतर फक्त ४६ चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य पूर्ण केले. लीग टप्प्यात ८ पैकी ७ सामने जिंकणाऱ्या ट्रेंट रॉकेट्सने अंतिम सामन्यातही आपणच प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले.
17 Aug 2026 01:55 PM (IST)
वाराणसीच्या लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते कमलेश राय यांच्या लायसन्स असलेल्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने एका महिलेसह दोन विमानतळ कर्मचारी जखमी झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी कमलेश राय यांना ताब्यात घेतले असून, स्थानिक पोलिसांमार्फत पुढील कायदेशीर कारवाई व चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावर मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं.
17 Aug 2026 01:45 PM (IST)
दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी ऱ्होड्स अजूनही जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो. जरी तो अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झाला असला तरी, जेव्हा एखादा क्षेत्ररक्षक चांगला झेल घेतो, तेव्हा त्याची तुलना अनेकदा जॉन्टी ऱ्होड्सशी केली जाते. गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने घेतलेल्या झेलमुळेही जॉन्टी ऱ्होड्सची आठवण झाली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, कर्णधार गिलने कामिंदू मेंडिसच्या गोलंदाजीवर एक अप्रतिम झेल घेतला.
17 Aug 2026 01:40 PM (IST)
संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जावा, येझदी आणि BSA रायडर्सनी नोमॅड्सच्या अंतर्गत देशभर बाईक रॅलीमध्ये भाग घेतला. या उपक्रमातून मोटरसायकल चालवण्यामागील स्वातंत्र्याची भावना साजरी करण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
17 Aug 2026 01:35 PM (IST)
मराठी रंगभूमीवर काही कथा अशा येतात, ज्या केवळ मनोरंजन करून जात नाहीत, तर प्रयोग संपल्यानंतरही मनात कुठेतरी रेंगाळत राहतात. ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे असंच एक वेगळं नाटक प्रेक्षकांसमोर येत आहे. कर्तव्य, प्रेम, आपली माती आणि माणसांमधलं नातं या सगळ्यांना सोबत घेऊन ही कथा रंगमंचावर आकार घेणार आहे.
17 Aug 2026 01:30 PM (IST)
युक्रेन आणि रशिया (Russia and Ukraine war) यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाने आता अधिक आक्रमक आणि धोकादायक वळण घेतले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या लष्करी तसेच महत्त्वाच्या औद्योगिक आणि आर्थिक तळांना लक्ष्य केले जात आहे. याच मालिकेत रशियाने रविवारी युक्रेनमधील सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण पोलाद कारखान्यावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या साह्याने जोरदार हवाई हल्ला चढवला. हा कारखाना भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती आणि जगप्रसिद्ध अब्जाधीश लक्ष्मी मित्तल यांच्या मालकीच्या ‘आर्सेलरमित्तल’ (ArcelorMittal Kryvyi Rih) या कंपनीचा आहे.
17 Aug 2026 01:25 PM (IST)
अभिनेत्री अनन्या राजच्या निधनाच्या बातमीने तिचे चाहते आणि मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ‘Ghost’, ‘7 Hours to Go’ आणि ‘The Final Exit’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनन्या राजचं १५ जुलै रोजी पहाटे झोपेतच निधन झालं. तिच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दुःखद बातमीची अधिकृत माहिती दिली.
17 Aug 2026 01:15 PM (IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला २० ऑगस्ट पर्यंत होणारी सुनावणी पुढे ढकलण्याच्या सुचना दिल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणात सीबीआय आणि ईडी चौकशीचे आदेश दिले होते.
17 Aug 2026 01:06 PM (IST)
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भगवान महाकालांच्या दर्शनासोबतच वर्षातून केवळ एकदा उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उज्जैनमध्ये दाखल झाले. नागपंचमी, श्रावण सोमवार आणि भगवान महाकालांची सवारी एकाच दिवशी आल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली.
17 Aug 2026 01:02 PM (IST)
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात चार दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. ११ ते १४ ऑगस्टदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स वितरण केंद्रे आणि डेअरी आस्थापनांची तपासणी करण्यात आली. स्वच्छतेचे निकष न पाळणे, अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन आणि आवश्यक परवाना नसल्याचे आढळल्याने १६ आस्थापनांचे परवाने व नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
17 Aug 2026 12:49 PM (IST)
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2004 ते 2014 या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षात होणारी घुसमट मी जवळून पाहिली होती, असे म्हटलं आहे. खासदार शेट्टी हे परळी येथे प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
17 Aug 2026 12:48 PM (IST)
परदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने खडकी रेल्वे स्थानक परिसरात पकडले आहे. या प्रकरणात सराइताच्या साथीदारालाही अटक केली आहे. त्यांच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी वीर श्याम दलगज (वय २२, रा. पारसी चाळ, देहूरोड), सार्थक शिवनागी वाघलगवे (वय २२, रा. पिंपरी) यांना अटक केली आहे. पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद खोपीकर, उपनिरीक्षक शंभू रणवरे, यशवंत साळुंखे, अमरदीप साळुंखे, इम्तियाज आवटी, धीरज कपिले, प्रशांत डोईफोडे, अमोल शेळके, सागर शेंडकर, गणेश बच्छाव यांनी ही कामगिरी केली आहे. दलगजविरुद्ध देहूरोड पोलिसांत गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.
17 Aug 2026 12:36 PM (IST)
व्यवसायासाठी एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून चुलतीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, त्यांच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जखमी महिलेचे नाव गुणवंती सुरेश सुराणा (वय ६६) असे आहे. त्यांनी खडक पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचा पुतण्या दिनेश जुगराज सुराणा (वय ५८) आणि फर्मान मन्सूर पारकर (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एकबोटे कॉलनी परिसरात घडली आहे.
17 Aug 2026 12:24 PM (IST)
डेक्कन जिमखाना भागातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलसमोर तरुणाच्या डोक्यात शस्त्राने वार करुन त्याला मारहाण केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी दोन तरुणींसह साथीदाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व प्रमोद जगताप (वय १९, रा. ऑरा सोसायटी, शिवसृष्टीजवळ, आंबेगाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधवी कुंभार (रा. काळेपडळ, हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव), शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जगताप याने डेक्कन पोलिसांत तक्रार दिली आहे.
17 Aug 2026 12:12 PM (IST)
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केवळ रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता कोंडीची कारणे दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. वाहतूक नियमन करताना ज्या चौकांत किंवा रस्त्यांवर खड्डे आढळतील, त्याची माहिती महापालिकेला देऊन ते बुजवून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहेत, असा दावा पोलिसांचा आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो तसेच वाहनचालकांना अचानक ब्रेक लावणे किंवा मार्ग बदलणे भाग पडते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. यामुळे वाहतूक पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची, चौकाची पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे खड्डे निदर्शनास आणावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी ह्या खड्ड्यांची माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेला द्यावी. नंतर महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हे खड्डे तातडीने बुजवून घेण्याची कार्यवाही करावी, असे सांगितले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केवळ वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता कोंडी निर्माण करणाऱ्या मूलभूत कारणांवरही उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. खड्डे नसल्याचा दावा महापालिका करत आहे. मात्र, शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्यांची माहिती महापालिकेला देण्यात येणार आहे.
17 Aug 2026 12:03 PM (IST)
विरारमध्ये भाजपच्या वतीने महापालिका मुख्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजन नाईक, ४३ नगरसेवकांसह हजारो नागरिक सहभागी झाले.
पाणीपट्टीत १०० टक्के वाढ, घरपट्टीतील छुपी करवाढ, शहरातील जीवघेणे खड्डे, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आणि पेल्हारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात भाजपने प्रशासनाला धारेवर धरले.
रस्ते दुरुस्तीसाठी झालेल्या अतिरिक्त खर्चाचे थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट, तसेच प्रशासकीय काळातील कामांचे स्पेशल ऑडिट आणि श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपने केली.
करवाढ तातडीने मागे न घेतल्यास आणि जनतेच्या प्रश्नांवर कार्यवाही न झाल्यास महापालिका मुख्यालयाचे कामकाज ठप्प करून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
17 Aug 2026 11:54 AM (IST)
संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा बौद्धवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या अगदी जवळच भलामोठा वाघ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोंबड्यांचा अचानक सुरू झालेला आरडाओरडा ऐकून घराबाहेर आलेल्या कांबळे भगिनींसमोरच फणसाच्या कट्ट्यावर बिबट्या बसलेला दिसल्याने त्यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली. या घटनेनंतर बौद्धवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे तरी कसे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे.
भडकंबा बौद्धवाडी येथे वासंती विठ्ठल कांबळे आणि प्रेमा कांबळे या दोन बहिणी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास खुरड्यातील तसेच झाडावर बसलेल्या कोंबड्यांनी अचानक जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. आवाजाने वासंती कांबळे यांना जाग आली. त्यांनी घराबाहेर येऊन पाहण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधारामुळे काहीच दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी कोंबड्यांना व्यवस्थित झाकून पुन्हा घरात प्रवेश केला.
17 Aug 2026 11:47 AM (IST)
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे. पारंपरिक सण-उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणिमात्रांविषयी प्रेमभावना, निसर्ग-संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे पाहिले जाते. “शेतकऱ्यांचा मित्र” समजल्या जाणाऱ्या नागाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखविला जातो.
17 Aug 2026 11:37 AM (IST)
गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी जप्त केलेला आणि चोरीला गेलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित नागरिकांना परत करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ कोटी ३६ लाख ८७ हजार ४८९ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला.
यामध्ये चोरीला गेलेली रोख रक्कम, सोने, मोबाईल फोन, दुचाकी तसेच सायबर आणि डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये चोरट्यांनी किंवा आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने वळवलेली रक्कम देखील तपासादरम्यान हस्तगत करून संबंधित नागरिकांना परत करण्यात आली.
विशेष म्हणजे, सायबर गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन फसवणूक करून बँक खात्यांमधून वळवण्यात आलेली रक्कम पोलिसांनी तपासाच्या माध्यमातून शोधून काढली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आली. त्यामुळे सायबर फसवणुकीतील नागरिकांसाठीही हा मोठा दिलासा मानला जात आहे.
१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या हस्ते फिर्यादी आणि संबंधित नागरिकांना मुद्देमालाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
17 Aug 2026 11:23 AM (IST)
बेकायदेशीर रिक्षा-टॅक्सी, ओला-उबर वाहने तसेच मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांविरोधात आजपासून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.
रिक्षा-टॅक्सीवरील कारवाई करताना कोणत्याही प्रकारची काटकसर किंवा तडजोड करू नये, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. कारवाईच्या प्रक्रियेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये तसेच नियमांची अंमलबजावणी करताना निष्पक्षपणे काम करावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
“संपूर्ण महाराष्ट्र प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र आरटीओ विभागाच्या सोबत आहे. या कारवाईबद्दल अभिनंदन,” असे देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच कारवाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर मराठी एकीकरण समिती लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






