Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसब्यातील उमेदवार मालामाल; संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का, भाजपच्या रासनेंकडे 17 कोटींची संपत्ती तर धंगेकरांकडे…

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2023 | 05:31 PM
कसब्यातील उमेदवार मालामाल; संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का, भाजपच्या रासनेंकडे 17 कोटींची संपत्ती तर धंगेकरांकडे…
Follow Us
Follow Us:

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी अर्ज दाखल केला. कसबा पेठमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या रासने आणि धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना संपत्ती जाहीर केली. यामध्ये दिलेल्या आकडेवारीतून कसब्यातील उमेदवार मालामाल असल्याचेच दिसत आहे.

भाजपच्या हेमंत रासनेंची संपत्ती किती?

हेमंत रासने यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता १२ कोटी ४९ लाख ४५४ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ३५ हजार ९०० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. याशिवाय, पत्नी मृणाली रासने यांच्या नावाने स्थावर आणि जंगम मालमत्ता ४ कोटी ६२ लाख २६ हजार ८५२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम २२ हजार २०० रुपये इतकी आणि १८ तोळे सोने आहे. रासने यांची एकूण संपत्ती तब्बल १७ कोटी इतकी असून, त्यांचा जमीन खरेदी करणे याकडे जास्त कल असल्याचे दिसत आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळच्या बोरघर, टाळसुरे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील पोंभुर्ले तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील म्हाळुंगे आणि भोर तालुक्यातील गोरड म्हशिवली येथे शेतजमीन आहे. हेमंत रासने आणि त्यांची पत्नी मृणाली रासने अशी दोघांच्या नावे 25 एकरहून अधिक जमीन आहे.

एक इनोव्हा आणि दुचाकी

हेमंत रासने यांनी आपले वार्षिक उत्पन्न ५ लाख ७५ हजार ४१० रुपये रुपये तर पत्नी मृणाली ४ लाख ३० हजार ८३० रुपये इतके दाखवले आहे. तसेच हेमंत रासने यांच्याकडे एक इनोव्हा कार आणि एक दुचाकी वाहन आहे.

एकही गुन्हा दाखल नाही

मुलगा आणि मुलीच्या नावाने जवळपास एक कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांची संपत्ती किती?

रविंद्र धंगेकर यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावे स्थावर आणि जंगम मालमत्ता ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ८९२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये इतकी आणि १५ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १० कोटी २४ लाख ३३ हजार ९९९ इतकी आहे.

धंगेकरांवर एकही गुन्हा दाखल नाही

तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

ऍक्टिव्हा, रॉयल एनफिल्डही

रवींद्र धंगेकर यांनी आपले वार्षिक उत्पन्न ३ लाख ३६ हजार ९४० रुपये रुपये तर पत्नी प्रतिभा ३ लाख ९८ हजार ४०० रुपये इतके दाखवले आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्याकडे एक होंडा ऍक्टिव्हा, एक रॉयल एनफिल्ड अशी एक दुचाकी वाहन आहे.

मोठी शेतजमीन

रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. ते स्वतः सोने-चांदीचे कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. तर त्यांच्या पत्नी या शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून दौंड तालुक्यातील पिंपळगाव आणि हवेली तालुक्यातील नांदोशी येथे जवळपास दहा एकर शेतजमीन तर पुणे शहरातील कोथरूड येथे पाच गुंठे जागा आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर अशी दोघांच्या नावे १० एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे प्रत्येकी एक फ्लॅट देखील आहे.

Web Title: 17 crores worth of bjp candidate hemant rasane and ravindra dhangekar have 10 crores property nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2023 | 05:31 PM

Topics:  

  • Ashish Deshmukh
  • Congress
  • Congress Politics
  • Hemant Rasane
  • Mallikarjun Kharge
  • Nana patole
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
1

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
2

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
4

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.