रायगड : रायगडमध्ये आज सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा अपघात (Raigad Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे येथून 57 प्रवाशांना घेऊन निघालेली ही बस ताम्हिणी घाटात उलटली. या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला असून 55 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात घडताच घटनास्थळी ग्रामस्थ आणि बचाव पथकाने वेळीच पोहचून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं करणार उद्घाटन! https://www.navarashtra.com/india/maharishi-valmiki-international-airport-will-be-inaugurated-by-pm-narendra-modi-today-nrps-493413.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे माणगव मार्गावर बस ताम्हिणी घाटात उलटून हा अपघात झाला आहे. पुण्याहून 57 प्रवाशांना घेऊन ही बस निघाली होती. पुण्यातील काही लोक सहलीसाठी कोकणात जात होते. दरम्यान आज हरिहरेश्वरला जाताना माणगावकडे येताना ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर बस येताच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस घाटात पलटली. यावेळी बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाळा सगळे जिवाच्या आंकाताने ओरडू लागले. या अपघाताची माहिती होताच स्थानिकांनी वेळीच धाव घेऊन बचाव पथकाच्या साहाय्याने जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 55 प्रवासी जखमी झाले आहे.
आज सकाळच्या सुमारास पुण्याहून काही पर्यटकांना घेऊन एक खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक MH 04 FK 6299 माणगावच्या दिशेने येत होती. सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटातुन जात असताना अचानक बस रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णायलयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवत पुन्हा वाहतूक सुरळीत केली. तसेच, पोलिसांकडून घटनेचा पंचनाम करण्याचे सुरु होते. तर, पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील रुग्णालयात पोहचले आहे.