संग्रहित फोटो
अमरावती : ईसार चिठ्ठीद्वारे (Isar letter) प्लॉटचा व्यवहार (Deal of plot) करून एका प्लॉट मालकाची( 20 lakhs fraud) करण्यात आली. विवेक विनायकराव हिवसे (४०, रा. चांदुरबाजार) असे फिर्यादीचे नाव आहे. यांनी एक नोंदणीकृत खरेदीचा करार केला. या कराराच्या साहाय्याने त्यांनी उषा रेसिडेन्सी (Usha Residency) येथे तिसऱ्या माळ्यावर एका फ्लॅटची खरेदी केली. त्यांना ती प्रॉपर्टी आवडल्याने ते खुश होते. परंतु, त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
त्यांना असे कळले की त्यांनी खरेदी केलेला तो फ्लॅट आरोपींनी रविंद्र भिमराव भागवत यांना या पूर्वीच रजिस्टर ईसार चिठ्ठीने (Register Isar Letters) विकत दिला आहे. अशा सर्व प्रकरणात त्याची खूप मोठी फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. आरोपींनी संगनमत करून हिवसे यांची २० लाखांनी फसवणूक केली. अशा आशयाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी (Gadgenagar Police) नरेश देविदास साहु (रा. चेतनदास बगिचा, मसानंगज) व समाधान रघुनाथजी मालवे (रा. कांमुंजा) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.