महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथील मंदिरात बुधवारपासून देणगी मोजण्यास प्रारंभ झाला आहे. गेले ३ दिवस २४ तास दानपेट्यांची मोजणी करत आहेत. त्यात २०० किलो सोने निघाले आहे. २०१८ नंतरच्या दोन पेट्या व २००९ ते २०१८ पर्यंतच्या दोन पेट्यांमधील मोजणी करण्यात आली.
शुक्रवारी एका बाॅक्समध्ये हिरे आढळले. त्यांचे शनिवारी सोलापूर येथील कारागिराच्या मदतीने मूल्यमापन करण्यात येणार आहे. याशिवाय २०१८ नंतरची एक पेटी राहिली असून त्याची मोजणी होणार आहे. त्यानंतर चांदीची मोजणी करण्यास प्रारंभ होणार आहे.
देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात. दरवर्षी तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येतात. भक्तगण आपल्या पात्रतेप्रमाणे देवीच्या चरणी दान देतात. सोने, चांदी, रोख रक्कम, दागिने असं दान भक्तांकडून देण्यात येतं.