Gadchiroli News: गडचिरोलीत वर्षभरात २०७५ क्षयरुग्णांची नोंद! आरोग्य विभागाचा धोक्याचा इशारा
२४ मार्च हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सन १९६२ पासून प्रस्थापित आहे. जिल्हा क्षयरोग केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा क्षयरोग दवाखान्यामध्ये हा कार्यक्रम
राबविला जात आहे. आरोग्य सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात अग्रेसर असलेली आरोग्य विभागाची यंत्रणा जिल्ह्यातील गावोगावी पोहचलेली आहे. त्यामुळे अनेक रोगाचे समूळ उच्चाटन करण्यात यश आले आहे. परंतु क्षयरोगावर
अद्यापही पूर्णपणे नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही, ही चिंताजनक बाब आहे. क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर उपचारार्थी रुग्णास दरमहा १००० रूपये निक्षय पोषण योजनेद्वारे औषधोपचार पूर्ण होईपर्यंत देण्यात येतात.
दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, संध्याकाळी हलकासा ताप वजनात घट होते, भूक मंदावने, छातीत दुखणे, धुंकीतून रक्त पडणे ही लक्षणे दिसून आल्यास क्षयरोगाचा संशयीत रुग्ण समजावा तसेच दूषित धुंकी, क्षयरोग रुग्णाच्या सहवासात असणारे व्यक्ती, कुपोषित, प्रतिकार शक्ती कमी असणारे व्यक्ती, मधुमेह असणारे व्यक्ती, दिर्घकालीन आजारी, वृद्ध व्यक्ती आदींना क्षयरोग आजार होण्याची शक्यता असते.
प्रत्येक नागरिकाने लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घ्यावी. समाजाच्या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास क्षयरोग निर्मूलन शक्य आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्ण शोध मोहीम, घरभेटी, उच्च जोखमीच्या गटांची तपासणी आणि उपचार पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी दुर्लक्ष न करता जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. लवकर निदान, नियमित उपचार आणि सामाजिक सहकार्य, हीच क्षयरोगावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. – डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी,






