नवऱ्याने फोन चेक करत घेतला चारित्र्यावर संशय, बायकोनं उचललं टोकाचं पाऊल; संभाजीनगरातील घटना (फोटो सौजन्य - pinterest)
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बायकोने आत्महत्या केल्याची घटना संभाजीनगरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत तिने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. डॉ. प्रतीक्षा भुसारे (वय 26) असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. प्रतीक्षाने तिच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
हेदेखील वाचा- दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात कोसळली 7 फूट उंच भिंत; दोघांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर शहरात 26 वर्षीय नवविवाहित डॉक्टरने पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. डॉ. प्रतीक्षा भुसारे हिचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते आणि ती नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील एका आघाडीच्या खाजगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली होती. मात्र तिचा नवरा तिला सतत त्रास देत होता आणि तिचा फोन चेक करत तिच्यावर संशय घेत होता. नवऱ्याच्या याच त्रासाला कंटाळून डॉ. प्रतीक्षा भुसारे यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. प्रतीक्षा भुसारे यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. प्रतीक्षा भुसारे यांनी आत्महत्येपूर्वी सात पानांची सुसाईड नोट लिहीली आहे. या सुसाईड नोटमध्ये डॉ. प्रतीक्षा भुसारे यांनी त्यांच्या पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे आणि त्याला या टोकाच्या पाऊलासाठी जबाबदार धरले आहे. डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध हुंड्यासाठी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेदेखील वाचा- TISS विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; अपार्टमेंटमध्ये सापडला मृतदेह, पोलीस तपास सुरु
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय डॉ. प्रतीक्षा भुसारे यांनी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सात पानी सुसाईड नोटमध्ये तिच्या पतीकडून होणाऱ्या छळाचा तपशील आहे. कारण तो तिच्या चारित्र्यावर शंका घेत असे आणि तिचे फोन कॉल रेकॉर्ड करत होता आणि मेसेज तपासत होता. यावर्षी 27 मार्च रोजी दोघांचे लग्न झाले होते. महिलेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, रशियातून एमबीबीएस केलेल्या पतीला स्वतःचे हॉस्पिटल उघडायचे होते आणि तो सतत त्यांच्या मुलीवर तिच्या पालकांकडून पैसे आणण्यासाठी दबाव आणत होता.
सुसाईड नोटमध्ये डॉ. प्रतीक्षा भुसारे यांनी त्यांच्या पतीवर छळ केल्याचा आरोप केला आहे आणि त्याला या टोकाच्या पाऊलासाठी जबाबदार धरले आहे. सिडको पोलिस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध हुंड्यासाठी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.