पाण्यावरून तुफान हाणामारी, शिवारात पडला रक्ताचा सडा; एकाच कुटुंबातील तिघांचा बळी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील भावी येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवारात विहिरीचे पाणी देण्यावरून तुफान हाणामारीत तिघांचा बळी गेला आहे. ही घटना दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात घडली. यामध्ये एका कुटुंबातील आप्पा परमेश्वर काळे व सुनील परमेश्वर काळे व दुसऱ्या कुटुंबातील आप्पा भाऊ काळे या तिघा जणांना जागी जीव गमावा लागला. तर वसाला आप्पा काळे ही गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी धाराशिव येथे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाशी तालुक्यातील भावी येथील पारधी समाजात शेतीला पाणी देण्यावरून विहिरीचे पाणी वाटपावरून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. एकमेकांना जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली. मध्यरात्री शेतात हा भयानक प्रकार सुरू होता. या हाणामारीत जीव जाईपर्यंत एकमेकांना मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेतलं..
शाळेतून घरी परतत असताना दोन विद्यार्थ्यांवर आज काळाने घाला घातला. रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने या दोन्ही मुलांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलीचा व मुलाचा समावेश आहे. ही घटना मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच घडल्याने अपघातानंतर नागरिकांनी लागलीच धाव घेत गर्दी केली होती. वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे असं मृत विद्यार्थांची नावे आहेत. दोघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. सकाळी दोघेजण शाळेत गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे यांना धडक दिली. भरधाव ट्रकने धडक दिल्यानंतर दोघंही रस्त्यावर फेकले गेले. ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दोघांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. भीषण अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि रुग्णालयात पाठवून दिले. दरम्यान अपघातानंतर ट्रक नागरिकांनी अडविला. यानंतर पोलिसांनी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. अपघातानंतर काही काळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.