मोर्शी : दिल्ली येथे ३१ जुलै रोजी वॉलेट लघुचित्रपट महोत्सव (Wallet Short Film Festival) ऑनलाईन पद्धतीने (Online method) पार पडला. संपूर्ण देशातून ७१०२ चे वर शॉर्ट फिल्मने (Short film) या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये अमरावती (Amravati) येथून ‘मै झुकेगा नही( Mai zukega nahi), फुग्गा (Fugga), एनसीडी (NCD) व लाल खून( Lal Khun) लघुचित्रपट पाठविण्यात आले होते. पुरस्काराची परंपरा कायम ठेवत चारही शॉर्ट फिल्मला चार पुरस्कार प्राप्त झाले.
मै झुकेगा नही, या क्षयरोगावर (Tuberculosis) आधारित फिल्मला बेस्ट फिल्ममेकर (Best Filmmaker), फुग्गा या एड्सवर (AIDS) आधारित लघुपटाला बेस्ट सोशल फिल्म (Best Social Film), असांसर्गिक आजारावर (Non-communicable diseases) आधारित एनसीडी या फिल्मला व मासिक पाळीवर ( menstruation) आधारित लालखून या फिल्मला बेस्ट ज्यूरी मेन्शन पुरस्कार (Best Jury Mention Award) प्राप्त झाले. चारही लघुचित्रपटाचे कथा पटकथा संवाद व दिगदर्शन धर्मा वानखडे यांनी केले आहे.
एनसीडी फिल्मच्या निर्माती अर्चना चौरपगार पाटील असून, फुग्गा फिल्मची निर्माती ज्योती वानखडे, लाल खूनचे निर्माते अनंत वासनिक तर मै झुकेगा नही फिल्मचे निर्माते डॉ. दिनेश अंभोरे हे आहेत. फिल्मचे संकलन भारत वानखडे यांचे आहे. छायांकन इरफान शेख, अक्षय खल्लरकर यांचे आहे. फुग्गा फिल्मचे सहदिग्दर्शन निलेश ददगाल व सागर भोगे यांनी केले आहे.
फिल्मचे कार्यकारी निर्माता सुरेंद्र आकोडे, राहुल पाटील, चंदू काळे हे असून फिल्मचे व्यवस्थापक आशिष सुंदरकर, प्रफुल्ल कोठेकर, आर्यन वानखडे हे आहेत. वेशभूषा व केशभूषा विनय भगत यांनी केली. लघुचित्रपटात धर्मा वानखडे, सपना बटुले, दिनेश इंगोले, सोनाली सरदार, डॉ. दिनेश अंभोरे, निलेश कथे, वसंत उके, प्रीती सोनटक्के, भारत वानखडे, अक्षय नगराळे यांच्यासह बालकलाकार म्हणून प्रणव साबळे व वंशिका इंगळे यांनी भूमिका निभावल्या.