Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: धरणांमध्ये ४१ टक्के जलसाठा शिल्लक! पावसाळ्यात यंदा धरणांतून विसर्गाचे प्रशासनाचे संकेत

अमरावती शहरासह ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अप्पर वर्धा धरणात ४६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी राहिली. आगामी पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास हे धरण लवकर भरून विसर्गाची वेळ येण्याची शक्यता आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 02:30 PM
Amravati News: धरणांमध्ये ४१ टक्के जलसाठा शिल्लक! पावसाळ्यात यंदा धरणांतून विसर्गाचे प्रशासनाचे संकेत

Amravati News: धरणांमध्ये ४१ टक्के जलसाठा शिल्लक! पावसाळ्यात यंदा धरणांतून विसर्गाचे प्रशासनाचे संकेत

Follow Us
Close
Follow Us:

गतवर्षीचा मोठ्या प्रमाणातील जलसाठा अद्याप शिल्लक असल्याने यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तुडुंब भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प मिळून ४१.३९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आगामी पावसाळ्यात धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात सध्या २६१.४२ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असून, तो धरणाच्या एकूण क्षमतेच्या तब्बल ४६ टक्के आहे. या धरणातून अमरावती शहरासह ग्रामीण भागातील विविध पाणीपुरवठा योजनांना पाणी दिले जाते. त्यामुळे नागरिकांसाठी हा साठा दिलासादायक मानला जात आहे.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी शहानूर धरणात १८.५० दशलक्ष घनमीटर, चंद्रभागामध्ये ३२.५५, पूर्णा प्रकल्पात २२.२६, सपनमध्ये १७.४८ तर पंढरी प्रकल्पात १२.५० दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. सर्व मध्यम प्रकल्प मिळून १०३.६४ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या ४०.४५ टक्के आहे. याशिवाय जिल्ह्यातील ४८ लघू प्रकल्पांत ६८.४१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाने संभाव्य अतिवृष्टी आणि विसर्ग लक्षात घेऊन खबरदारीची तयारी सुरू केली आहे. अद्याप प्रत्यक्ष धरणक्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसली तरी आगामी महिनाभर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

धरणांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने यंदाच्या पावसाळ्यात अचानक विसर्ग करावा लागू शकतो. त्यामुळे जलसंपदा विभागाने धरण क्षेत्रातील यंत्रणा सतर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या आगमनानंतर जलपातळी वेगाने वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रचंड उष्णतेमुळे वरूड तालुक्यातील धरणांतील जलसाठ्यात मोठी घट झाली असून, सध्यातरी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जलसंधारण व जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या अनेक धरणांमधील साठा ४० टक्क्यांच्या खाली घसरला आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या अखेरीसही सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा पारा सातत्याने चढलेला आहे.

वरुड तालुक्यातील स्थिती

जलसंधारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार पळसोना लघु प्रकल्प ३०.९० टक्के, लिंगा लघु प्रकल्प २७.१३ टक्के, लोणी लघु प्रकल्प २६.८७ टक्के, जामगाव लघु प्रकल्प ३२.३९ टक्के, जमालपुर लघु प्रकल्प ३१.९४ टक्के, पंढरी लघु प्रकल्प ३२.३२ टक्के, नागठाणा लघु प्रकल्प ३५.०९ टक्के, पुसली लघु प्रकल्प ३६.५८ टक्के, वाई लघु प्रकल्प ३९.६३ टक्के, सातणुर लघु प्रकल्प ३८.७० टक्के, बहादा लघु प्रकल्प ३५.६६ टक्के, चांदस वाठोडा लघु प्रकल्प २८.१५ टक्के, पाक नदी प्रकल्प ५५.७०, शेकदरी प्रकल्प ३२.६१ टक्के, लोणी धवलगीरी प्रकल्प ४०.३३ टक्के, नागठाणा २ प्रकल्प ५५.६३ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

कापूस उत्पादकासाठी स्वतंत्र उत्पादकता मिशन! केंद्र शासनसतर्फे ‘मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी’ जाहीर

जिल्हाधिकारी जलसंधारणाची कामे करायची आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावासाठी टार्गेट दिले आहे. यामध्ये १० कामे सामूहिक व १५ कामे वैयक्तिक, जसे तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, रोहयोतून कार्यालयाकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार जून महिन्यात पाऊस कमी पडेल किंवा उशिरा पडेल. त्यासाठी जास्तीत जास्त जलधारा यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावे व पाण्याचा वापर नागरिकांनी जपून करावा, असे मत रामदास शेळके, तहसीलदार वरुड यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 41 percent water storage left in dams administrations indication of discharge from dams this year during monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Amaravati
  • monsoon rains
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Amravati News: जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत! पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढतोय रोष
1

Amravati News: जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत! पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढतोय रोष

छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेले वादळ; चिकलठाणा विमानतळाचे शेड उडाले, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली!
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये ताशी ६३ किमी वेगाने आलेले वादळ; चिकलठाणा विमानतळाचे शेड उडाले, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली!

मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप
3

मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.