धरणांच्या जलसाठ्यात वाढ, राज्यातील बहुतांश धरण प्रकल्पांमध्ये ५० टक्के पाणीसाठा
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, नद्या, नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातच आनंदाचीही बाब म्हणजे, राज्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
Pune News: एकीकडे 1300 टँकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
पुण्यात गेल्या वर्षी १५ टक्क्यांवर असलेला उपयुक्त जलसाठा यंदा ५८.२१ टक्क्यांवर आहे. नाशिकच्याही बहुतांश धरण क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस झाल्याने गेल्यावर्षी १७ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा ५२.५४ टक्क्यांवर आहे. मराठवाड्यातील ही बहुतांश धरणांमध्ये पाण्याची वाढली आहे. गंगापूर धरणातून गुरुवारी दुपारी बारा वाजता ३७१६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरू झाला असून, नाशिकमध्ये रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचे पाणी लागले आहे. दुसरीकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांमुळे उजनी धरणात होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला.
खडकवासला धरणातून विसर्ग
पुणे घाटमाथासह शहरात तसेच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे रात्री बारापासून ६४५१ क्युसेक विसर्ग करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील १७ धरणे फुल्ल
रायगड जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसान अलिबाग, मुरुड, रोहा, नागोठणे परिसराल झोडपून काढले. त्यामुळे धरणांच्य पातळीत कमालीची वाढ झाली आहे जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १७ धरणे १०० टक्के भरली असून, रायगड जिल्ह्याल् पाणीपुरवठा करणारे उन्नई धरण क्षमतेपेक्ष अधिक भरले आहे. धरणातून होणाऱ्या विसर्गमुळे कुंडलिका नदी पातळीत मोट वाढ झाली असून, पाणी नदीपात्राच्य इशारा पातळीपर्यंत पोहोचले आहे.
बोटीने प्रवास करताना सावध राहा !
उत्तर महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी कायम असल्याने कोयना धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात ५६ टीएमसी पाणीसाठा आहे. महाबळेश्वरच्या पावसानेही दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. बहुतांश मोठे प्रकल्प ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत भरले आहेत.
Malnourished Children : राज्याला कुपोषणाचा विळखा, १ लाख ८२ हजार कुपोषित बालकांची नोंद
मागील चार दिवसांत गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने गुरूवारी सकाळी ११ वाजल्यापासून विसर्ग सुरू केला आहे. नदीपात्रातून बोटीने प्रवास करणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, असा आवाहन गोसेखुर्द धरण प्रशासनाने केला आहे.