नाशिकच्या द्वारका पुलावर भीषण अपघात; लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपची धडक; ६ जणांचा मृत्यू
Nashik Accident : नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाला झाला असून या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांची मदतीसाठी एकच धावाधाव सुरु झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ ते ६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहेत. तर १० ते १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपने मागून धडक दिली. या अपघातामुळे नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातानंतर उड्डाण पुलावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातानंतर या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातानंतर रोडवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गेल्या ३० मिनिटांपासून वाहतूक ठप्प आहे. अपघातानंतर लोकांची एकच धावाधाव झाली.
दरम्यान, या अपघातानंतर मुंबई नाका आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. या अपघामधील जखमी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बारामती रस्त्यावर बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक नजीक कठीण पूल येथील तुकाई नगर जवळ चार चाकी व ट्रक चा भीषण अपघात झाला असून यामध्ये कार चालक, महिला, बालके गंभीर जखमी झाले आहेत. वालचंदनगर परिसरातील एक कुटुंब आपल्या एक्स यू व्ही कार मधून मांढरदेवी या ठिकाणी काळूबाईच्या दर्शनासाठी बारामती बाजूकडून निरेकडे निघाले होते. तर नीरा बाजूकडून बारामती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट चा मालवाहतूक करणारा मालट्रक बारामतीच्या दिशेने निघाला होता. हॉटेल रेहान नजीक ट्रकने ( क्र.एम एच ४२ टी ९५४५ ) चुकीच्या बाजूला जात एक्स यू व्ही कारला ( क्र.एम एच १४ इ यू ७३५३ ) समोरासमोर जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती कळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी बारामतीला पाठवले. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वडगाव निंबाळकरच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातात महिला व बालके गंभीर जखमी झाल्याने लोकांनी हळहळ व्यक्त केली.