
Maharashtra Political Crisis 2026, Jayant Patil Vinod Tawde Meeting, Sharad Pawar
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता शरद पवार यांच्याही राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्यातील एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याची मागणी करत आहे, तर दुसरा गट काँग्रेससोबत जाण्याचा आग्रह करत आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सध्या १० आमदार आणि ८ खासदार आहेत. शरद पवार यांनी या सर्व आमदार आणि खासदारांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी एक वरिष्ठ नेत्याकडे सोपवली असल्याची माहिती आहे. यासोबतच एका ज्येष्ठ नेत्याकडे भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. भाजपसोबत सत्तेत सामील व्हायचं की नाही, याबाबत आमदार आणि खासदारांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमद्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार आहे
जानेवारी 2026 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर काही दिवसांतच दोन्ही राष्ट्रवादी एक येऊन सत्तेत सहभागी होणार होत्या, अशाही चर्चा झाल्या. पण त्यानंतर झालेल्या वाटाघाटींनंतर या चर्चा थांबल्या. पण आता पुन्हा एकदा शरद पवार गट भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पवार गट भाजपसोबत गेल्यास त्यांना सत्तेत काय वाटा मिळणार, यासंदर्भात जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाल्याचे समोर आले आहे. जयंत पाटील- विनोद तावडे यांच्या चर्चेनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका मोठ्या नेत्यासोबत चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे. या सर्व घडामोडींवरून शरद पवार गटाच्या सत्तेत सामील होण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे.
शरद पवार यांचं आतापर्यंतच राजकारण कायमच चर्चेत राहिल आहे. त्यांच्या धक्कातंत्रामुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यांच्या अशा राजकीय धोरणांमुळे त्यांची ठाम राजकीय भूमिका काय, या बद्दल कोणीच ठोस अंदाज लावू शकत नाही. शरद पवार यांच्या राजकीय खेळी महाराष्ट्राने अनेकदा पाहिल्या आहेत.