File Photo : Accident
हिंगोली : मॉर्निंग वॉकला गेलेल्या वकिलाला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत वकिलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. ॲड. बी. जी. लेमले (वय 42, रा. भिरडा, ता. हिंगोली) असे यामध्ये मृत्यू झालेल्या वकिलाचे नाव आहे.
हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील ॲड. बी. जी. लेमले यांचे भिरडा शिवारातच शेत आहे. ते दररोज भिरडा शिवारात मॉर्निंग वॉकला जातात. त्यानंतर शेतातही चक्कर मारतात. नेहमीप्रमाणे आज पहाटे ॲड. लेमले हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी कलगाव पाटीजवळ भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. त्याच भागात काही तरुण धावण्याच्या सरावासाठी आले असताना त्यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने बासंबा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.