फोटो सौजन्य - सोशल मिडीया
वर्धा जिल्ह्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या वडनेर येथे एका पोलीस निरीक्षकाचा रात्री झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. रात्री झोपेत हृदविकाराच्या झटक्याने पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे वडनेर गावात शोककळा पसरली आहे. मनोज वाढीवे असं मृत वडनेर पोलीस निरीक्षकाचं नाव आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या वडनेर येथे एका पोलीस निरीक्षकाचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री झोपेत हृदविकाराच्या झटक्याने मनोज वाढीवे यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे वडनेर गावात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनेर पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे शुक्रवारी, २८ जून रोजी रात्री पोलीस स्टेशनमधील काम आटोपून वडनेर येथील शासकीय निवासस्थानात आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी ते पोलीस स्टेशनमध्ये आले नाहीत. त्यामुळे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांकडून त्यांना सतत फोन केले जात होते. मात्र मनोज वाढीवे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पोलीस कर्मचारी मनोज वाढीवे यांना भेटण्यासाठी वडनेर येथील शासकीय निवासस्थानात गेले. पोलिसांनी खूप वेळ दार वाजवले, पण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर पोलीस कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा मनोज वाढीवे खोलीत मृतअवस्थेत पडले होते.
अंजणी धरणाजवळ एका प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार २९ जून रोजी घडली आहे. अंजणी धरणाजवळ आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर हे नाशिकच्या अंबड येथील रहिवासी होते. तर या अपघातात चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे अंबड गावावर शोककळा पसरली.