पुणे : तांत्रिक विश्लेषणाद्वारे पुण्यातील (Pune) एका रिक्षा (Riksha) चोरट्याचा शोध दत्तवाडी पोलिसांच्या (Police) तपास पथकाने लावत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मांजरी, सोलापूर रस्ता तसेच हडपसर भागात पोलिसांनी तळ ठोकून या चोरट्याला पकडले. त्याच्याकडून दोन लाखांची एक रिक्षा जप्त केली असून, त्याने आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे.
सुनील बब्रुवान लांडगे (वय ३१, रा. हडपसर) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
दोन लाखांची एक रिक्षा जप्त
शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पण, त्याप्रमाणात पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यात यश येत नसल्याचे वास्तव आहे. यादरम्यान, दत्तवाडी परिसरातून काही दिवसांपुर्वी पार्क केलेली रिक्षा चोरून नेण्यात आली होती. या चोरट्याचा माग काढला जात होता.
दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरटा मांजरी, हडपसर व सोलापूर रस्ता परिसरत फिरत असल्याचे लक्षात आले. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, दयानंद तेलंगे पाटील, अमित सुर्वे व त्यांच्या पथकाने या परिसरात दोन दिवस या चोरट्याचा शोध घेतला. पथक दोन दिवस येथे तळ ठोकून संशयित चोरट्याचा व रिक्षाची वाट पाहत होते. पण, तो काही सापडत नव्हता. मात्र, पहाटेच्या सुमारास मांजरी रस्त्यावर नंबर क्रमांक नसलेली नवीन रिक्षा जात असल्याचे दिसून आले. लागलीच पथकाने या रिक्षा पाठलाग करून रिक्षा अडवली व चालकाकडे कागदपत्रांची माहिती विचारली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
रिक्षाची तपासणी केली असता शिट खाली संबंधित रिक्षाची नंबर प्लेट लपवून ठेवल्याचे दिसून आले. त्यानूसार, सुनील लांडगे याला पकडण्यात आले. त्याने यापुर्वीही असे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानूसार, त्याचा शोध घेतला जात आहे.