Abacus Group In Wai In Maharashtra 110 Student Success Nrab
वाईतील अबॅकस ग्रुपचा महाराष्ट्रात डंका ; ११० विद्यार्थ्याचे घवघवीत यश
महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनच्या वतीने पाचगणी येथे झालेल्या तिसऱ्या ओपन अबॅकस स्पर्धेत वाईच्या यस ग्रुप अबॅकस अकॅडमी ने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या घवघवीत यशाने वाईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वाई : महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनच्या वतीने पाचगणी येथे झालेल्या तिसऱ्या ओपन अबॅकस स्पर्धेत वाईच्या यस ग्रुप अबॅकस अकॅडमी ने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या घवघवीत यशाने वाईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत वाईचे एकूण ११० विद्यार्थी अबॅकसच्या वेगवेगळ्या लेव्हल्स व गटामधील स्पर्धेत यशस्वी झाले, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, न्यूऐरा शाळेचे मुखयाध्यापक तसेच ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक शिवाजी शिंदे, तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाचगणीच्या भारती बिरामणे याच्या हस्ते यस ग्रुप अबॅकस अकॅडमीच्या सौ. शिफा वसीम आतार यांना ट्रॉफी व मान पत्र देऊन गौरवण्यात आले,
या स्पर्धेसाठी नागपूर, भुसावळ, नांदेड, औरंगाबाद, महाड, नगर, सोलापूर, सांगली, सातारा इत्यादी १६ जिल्ह्यांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ पाचगणीतील विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाचगणी येथे पार पडला. सूत्रसंचालन अभिजीत मुळे नागपूर यांनी केले,
महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनचे प्रेसिडेंट उमेश महाजन भुसावळ यांनी स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू त्यामागील कारण स्पष्ट केली. सौ. शुभांगी हेडाव यांनी सर्व विद्यार्थी पालक आणि सहभागी झालेल्याचे आभार मानले. सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ. राजश्री बोलके, गौरी इंगळे, वनिता कांबळे, रूपाली ढोणे, पायल चव्हाण यांनी सहकार्य केले
Web Title: Abacus group in wai in maharashtra 110 student success nrab