कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे (Commissioner Dr Bhausaheb Dangde) यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप (Deputy Commissioner Sudhakar Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम कुंभार खान पाडा, होली क्रॉस स्कूल समोरील बांधकामधारक मनोज म्हात्रे , मंदार म्हात्रे, मयूर म्हात्रे यांच्या तळ + ६ मजली इमारतीच्या बांधकामाचे स्लॅब पाडकाम कारवाई मंगळवारी दिवसभरात केली.
सदर कारवाई करतेवेळी या ठिकाणी बांधकामधारकांनी महापालिकेची यंत्रसामुग्री व मनुष्यबळ पोहचू नये, याकरिता इमारतीच्याकडे जाण्याच्या रस्त्यात वाहने ऊभी करुन अडथळा निर्माण केला होता. तथापि संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलीस विभागामार्फत अडथळा दूर करण्याची कारवाई झाल्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली.
[read_also content=”खाकीनेच खाकीचा केला घात! पोलिसाकडूनच महिला पोलिसाचा विनयभंग, पोलीस हवालदार राजू पाटील याचे कृत्य; वाचा कुठं आणि कशी घडलीये घटना https://www.navarashtra.com/crime/khaki-attacked-khaki-pen-crime-news-pc-raju-patils-act-of-molesting-a-policewoman-by-police-itself-nrvb-391531.html”]
सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि ४ काँक्रीट ब्रेकर व २० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली. सदर बांधकामधारकांवर यापूर्वीच एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[read_also content=”इथं-तिथं आहे यांच्याच नावाची चर्चा, ज्यांनी IPL च्या मैफलीत लावलेत चार चाँद https://www.navarashtra.com/web-stories/hottest-female-anchors-in-ipl-2023-sanjana-ganesan-ridhima-pathak-nashpreet-kaur-mayanti-langer-nrvb/ आजचे राशीभविष्य : 26 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-26-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
तरी नागरिकांना महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येते की, कल्याण डोंबिवली परिसरात घरे घेताना महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात किंवा नगररचना विभागाकडे बांधकामाच्या अधिकृततेबाबत चौकशी करुन घरे विकत घ्यावीत.