Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना, सौजन्य : सोशल मीडिया
भारत स्वदेश अंतर्गत हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गाचा विकास आणि मारळ येथील Star Gazing Centre संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. बैठकीस पर्यटन संचालनालय, उपअभियंता सोनिया महिंद यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मारळचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. समुद्रकिनारा, धार्मिक वारसा, निसर्ग, ग्रामीण जीवनशैली आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांना जोडणारे एकात्मिक पर्यटन केंद्र म्हणून मारळचा विकास करण्याचा प्रयत्न आहे.
मारळ परिसरातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर आणि आरावी ही पर्यटनस्थळे विकसित होत असून, श्रीवर्धन तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे.
हरिहरेश्वर हे ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असल्याने या धार्मिक वारशाचा संदर्भ घेत मारळ परिसराचा धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येत आहे. हरिहरेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा नव्याने निश्चित करावी. तसेच मारळ येथील प्रस्तावित खगोल निरीक्षण केंद्रासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रादेशिक पाहणी करावी. पर्यटन विभागाकडे सादर करण्यात येणारा प्रस्ताव सर्व आवश्यक बाबींचा समावेश करून तातडीने सादर करण्याचे निर्देश आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.






