फोटो सौजन्य- प्रतिनिधी
किरण बाथम/रायगड: रायगडमधील माथेरान हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. हे ठिकाण डोंगर माथ्यावर वसले असून या घाट माथ्यावर जाण्यासाठी असलेल्या डोंगर विविध प्रकारच्या झाडे झुडपांच्या गर्द झाडांनी व्यापला आहे.याच डाेंगरामध्ये सध्या निळाई पसरली आहे असून कारवीच्या झाडांनी माथेरानचा डोंगर फुलला आहे.कारवीची फुलांनी माथेरानच्या निळ्या रंगाचा उत्सव भरला आहे. ही निळ्या रंगांचा उत्सव पर्यंटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
कारवीच्या झाडांना दर सात वर्षांनी येतात फुले
पश्चिम घाटातील सखल टेकड्यांवर तसेच कास पठारावर आढळणाऱ्या कारवी तसेच इतर फुलांचा मनमोहक आनंद लुटण्यासाठी पर्यावरण प्रेमी मोठ्या प्रमाणात जात असतात. मात्र, सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखला जाणारा खारघर डोंगर विविध रंगीबेरंगी रान फुलांनी नटलेला आहे.नेरळ माथेरान घाट रस्त्यातील माथेरानचा डोंगर हा दरवर्षी वेगवेगळ्या फुलांनी बहरतो. मात्र कारवीचे जंगल यावर्षी मोठ्या प्रमाणात बहरले असून कारवीच्या झाडांना दर सात वर्षांनी फुले येतात. निळ्या भडक रंगाची हि फुले आकर्षक असतात आणि त्या फुलांमुळे चाड उताराच्या माथेरान जंगलात निळाई पसरली असल्याचा भास होतो.अनेक पुष्प तज्ञ् यांची पावले माथेरान कडे वळली असून माथेरान डोंगरातील कारवीच्या फुलांचा बहर सुरु झाला असून माथेरान चे जंगल अधिक आकर्षक दिसून येत आहे.
कारवीच्या झाडाचे वैशिष्ट्य
सात वर्षांनी एकदा उमलणाऱ्या जांभळ्या रंगाच्या टपोरी कारवी फुलांनी बहरला आहे. याशिवाय हिरव्यागार गवतांच्या झाडाझुडपात बहरलेली लाल, पिवळी, गुलाबी, निळी, जांभळी, पांढरी रंगाची फुले आणि त्या फुलांवर मुक्तपणे बागडणारी फुलपाखरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.माथेरानचे डोंगरावर जंगली फुलांच्या इतरही अनेक प्रजाती आहेत. विशेष म्हणजे सेरोपेजिया आणि सनड्यू दुर्मिळ वनस्पती डोगरावर बहरल्या आहेत. 2016 नंतर यावर्षी कारवी फुलांनी माथेरानचा डोंगर बहरला आहे.या फुलांमधे भरपूर पराग आणि मकरंद मिळत असल्यामुळे मधमाश्या या बहराच्या वेळी कारवी फुलांच्या जाळीवरच डेरा देऊन बसत असल्याचे चित्र दिसते.या कारवीच्या झाडांचे आणखी एक वैशिट्य म्हणजे एकदा कारवीच्या झाडाला फुले आली कि नंतर ते कारवीचे झाड हे मृत होते.