वडगाव मावळ : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी मावळ तालुका उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पक्षाच्या वतीने वडगावात जोडे मारो आंदोलन करण्यात आले राज्यभरातून ठिकठिकाणी सोमय्या यांच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करत आंदोलन केले जात आहे.वडगाव मावळ पंचायत समिती चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली याबाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
सोमय्या यांच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती चौकात महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या सोमय्याला महाराष्ट्रातून हाकलून द्या अशी जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलन केले
यावेळी जिल्हा संघटीका शैला खंडागळे,तालुका संघटिका अनिता गोणते आशा चौरघे,सुमन आवळे, तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर,जिल्हा उपप्रमुख सुरेश गायकवाड,उप तालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, सोमनाथ कोडे, बाळासाहेब फाटक वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते , संतोष ढोरे मनोहर फाटक, माणिक चव्हाण,अविनाश रवणे, संतोष शिदे सागर वारुळे
सोमय्या यांची झेड सुरक्षा काढून टाकण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक व्हावी, अशी मागणी या वेळी महिला कार्यकर्त्यांनी केली