मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे कूच; जामखेडमध्ये स्वागताची तयारी, श्रीगोंद्यात मुक्काम
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे प्रवास सुरू झाला आहे. त्यांच्या नियोजित मार्गानुसार 16 सप्टेंबरला श्रीगोंदा येथे मुक्काम होणार आहे. जरांगे पाटील यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासह विविध मागण्या मांडल्या आहेत. मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या उद्देशाने मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
India Pakistan Naval Clash Arabian Sea: अरबी समुद्रात पाकिस्तानची नापाक कारवाई; भारतीय जहाजाला धडक
दरम्यान, जामखेडमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मराठा कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली आहे. मोठमोठे पोस्टर लावण्यात आले असून स्वागतासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा. या आंदोलनाला मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवल्याचं सांगण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. मात्र मागण्यांवर अपेक्षित निर्णय झाला नाही. त्यामुळे ते पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी. त्यांच्या मुंबई आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
India Pakistan Naval Clash Arabian Sea: अरबी समुद्रात पाकिस्तानची नापाक कारवाई; भारतीय जहाजाला धडक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या मार्गातील जामखेडमध्ये स्वागतासाठी मराठा कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी जामखेडमध्ये ठिकठिकाणी पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांकडून चिवडा तसेच इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या सोबत येणाऱ्या आंदोलकांना पाणी आणि नाश्ता उपलब्ध करून दिला जात आहे.






