मुंबई : राज्यसभेचा (Rajya Sabha 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी आपले उमेद्वार जाहीर केले आहेत. महायुतीमधून आत्तापर्यंत चार राज्यसभेचे उमेदवार (Rajya Sabha candidate) जाहीर करण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा (Milind Deora) यांना तिकीट देण्यात असून भाजपकडून (BJP) अशोक चव्हाण (Ashok Chavan), मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) व डॉ. अजित गोपछडे (Dr. Ajit Gopchade) यांना संधी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अजित पवार गटाने (Ajit Pawar group) राज्यसभेच्या उमेदवाराची नावे समोर आणलेली नाहीत. राज्यसभेसाठी एका उमेदवारासाठी कार्यकर्ते आग्रही असून न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा देखील दिला आहे.
महायुतीमधील अजित पवार गटाने अजून आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षातून केली जात आहे. पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेद्वारीसाठी आग्रह धरला आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील, असा थेट इशारा देणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केले आहे. अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ दादा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्या अन्यथा हजारो युवक बाहेर पडतील असा थेट इशारा पक्षश्रेष्ठींना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी दिला@AjitPawarSpeaks @SunilTatkare @praful_patel @parthajitpawar pic.twitter.com/PGaz6z4S23
— Ncp Ravindra Nana Patil (@NcpRavindraNana) February 14, 2024
अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासाठी खास ट्वीट केले असून अजित पवार यांना इशारा दिला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्या, अन्यथा हजारो तरुण कार्यकर्ते बाहेर पडतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील यांचा इशारा…” असे ट्वीट करत रवींद्र पाटील यांनी इशारा दिला आहे. अजित पवार या मागणीचा किती विचार करतात आणि राज्यसभेसाठी मुलगा पार्थ पवार यांना संधी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.