अकोला : पुरामुळे नुकसान झालेल्या गुडधी परिसरातील आपत्तीग्रस्तांना सहा महिन्यानंतरही मदत न मिळाल्याने संतप्त महिलांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. जिल्ह्यात २१ जुलै रात्री मुसळधार पाऊस झाला होता. सखल भागात आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. पावसाच्या पाण्याने ग्रामीण व शहरी भागातील घरांची पडझड झाली होती.
[read_also content=”नागपुरात उभारला जाणार देशातील सर्वात मोठा इनोव्हेशन आणि रिसर्च पार्क, आयआयएम नागपूरचा बहुउद्धेशीय प्रकल्प https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/the-largest-innovation-and-research-park-in-the-country-to-be-set-up-at-nagpur-iim-nagpur-multipurpose-project-nraa-255335.html”]
संसारोपयोगी साहित्य, पशुधन, घरातील धान्यासह जीवनावश्यक वस्तूंही वाहून गेल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून शहर तसेच ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीचा व ढगफुटी सदृश्य पावसाच्या नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला होता. अकोला येथील बहुतांश नुकसानग्रस्तांना मदतही देण्यात आली. मात्र, शहरातील गुडधी मधील प्रभाग क्रमांक चारमधील पूरपीडित अजूनही मदतीपासून वंचित आहेत. त्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.