अकोला : कोरोनाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने देण्यात आला होता परंतु तसे काही झाले नाही; माञ आता चीन आणि लगतच्या देशांमध्ये कोरोनाची चवथी लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले असून, गुरूवार १७ मार्च रोजी या लसीकरणाकडे या वयोगटातील बालकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरम्यान, पालकांनी मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
[read_also content=”प्रतिष्ठीतांचा जुगार चव्हाट्यावर, तब्बल ९ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त, रंगपंचमीला १७ जुगा-यांना अटक https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/gambling-of-celebrities-on-the-spot-property-worth-rs-9-lakh-84-thousand-seized-17-gamblers-arrested-on-rangpanchami-nraa-257193.html”]
कोरोनाच्या चवथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गापासून मुलांचा बचाव करण्यासाठी गुरुवार, १७ मार्चपासून अकोला जिल्ह्यातही १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले, परंतु मोहिमेच्या पहिल्या दिवशी विशेष प्रतिसाद मिळाला नाही. अकोला जिल्ह्यात केवळ सात मुलांनी ‘कॉर्बेव्हॅक्स’ लसीचा डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूञांनी दिली आहे. जिल्ह्यात ३ जानेवारीपासून १५ ते १७ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली होती, परंतु १५ वर्षाखालील मुलांचे लसीकरण सुरू होण्याची प्रतीक्षा होती. यासंदर्भात शासन आणि प्रशासनाकडून पाहिजे तशी जनजागृती न करताच गुरुवारपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. अकोला जिल्ह्यात सुमारे ५० हजार मुलांना या वयोगटात लस दिली जाणार आहे.
[read_also content=”डॉक्टरनेच विकले सात लाखात नवजात बाळाला, नागपुरात सरोगसीच्या नावावर मोठी फसवणूक https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/doctor-himself-sold-seven-lakh-newborn-baby-a-big-scam-in-the-name-of-surrogacy-in-nagpur-nraa-256434.html”]
विभागाला ‘कॉर्बेव्हॅक्स’चे अडीच लाख डोस प्राप्त
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांची संख्या गृहित धरून कॉर्बेव्हॅक्स लसीचा अडीच लाख डोसचा साठा प्राप्त झाल्याची माहिती वरिष्ठ औषधी निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिली. प्राप्त लसींच्या साठ्यामधून अकोला जिल्ह्याला बालकांच्या संख्येच्या तुलनेत ४३ हजार २००, अमरावती जिल्ह्याला ६४ हजार ८००, बुलडाणा जिल्ह्याला ६४ हजार ८००, वाशिम जिल्ह्याला २१ हजार ६०० आणि यवतमाळ जिल्ह्याला ६४ हजार ८०० असे एकूण २ लाख ५९ हजार २०० डोस प्राप्त झाले आहेत.
[read_also content=”दुचाकीवर पकडला चक्क ८० किलो १२ लाखांचा गांजा, महिला पोलीस निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/80-kg-12-lakh-cannabis-seized-on-two-wheeler-nraa-257178.html”]
जनजागृती होणे आवश्यक
दरम्यान, १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यापूर्वी त्यासंदर्भात शाळांमधून आवश्यक ती जनजागृती केली जाणे आवश्यक होते परंतु, तशी जनजागृती न करण्यात आल्याने अजूनही अनेक बालके या मोहिमेपासून अनभिज्ञ आहेत. पहिल्या दिवशी मोहिमेला प्रतिसाद मिळाला नाही त्यासाठी सध्या शाळा आणि परीक्षा सुरू असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी मुळात याची जनजागृती होणे महत्वाचे आहे.