अकोला : मराठा सेवा संघाचे सक्रिय पदाधिकारी व साहित्यिक मार्तंडराव माळी त्यांच्याच अपार्टमेंटच्या गच्चीवर फिरत असताना सर्विस गल्लीमध्ये पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यांच्या मृत्यू बद्दल तर्क-वितर्क लावले जात असून नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेमुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
[read_also content=”नागपूर हादरले, मोकळ्या मैदानात सापडले ४ अर्भक कुठून आले ? कुणी टाकले असंख्य प्रश्न ? https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/nagpur-trembled-found-in-the-open-field-4-infants-came-from-where-numerous-questions-asked-by-someone-nraa-252560.html”]
शास्त्री नगर येथे राहणारे साहित्यिक मार्तंडराव माळी हे काही दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्यामुळे रुग्णालयात भरती होते. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना आठ दिवसांपूर्वी घरी आणले होते. त्यांच्या दैनंदिनीनुसार ते दररोज सकाळी त्यांच्या अपार्टमेंटच्या गच्चीवर फिरायला जात होते. आजही ते सकाळी फिरायला गेले होते. मात्र, अपार्टमेंटच्या मागे असलेल्या सर्विस गल्लीमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.