• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amit Thackeray Criticized Administration Of Mumbai University

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे रात्रीस खेळ चाले…; अमित ठाकरेंची जहरी टीका

मुंबई विद्यापीठामधील प्रशासनावर विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. विद्यापीठाकडून नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर प्रशासनानंतर हा निर्णय दिला आहे. मनसे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोष व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 21, 2024 | 11:22 AM
amit thackeray on mumbai university

फोटो - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुंबई विद्यापीठामधील भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठातील अंतिम टप्प्यामध्ये आलेली निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभेची ही निवडणूक होती. शेवटच्या टप्प्यात असताना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनांकडून रोष व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या कारभारावर आणि निर्णयावर ताशेरे ओढले जात आहेत. यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अमित ठाकरे यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांनी लिहिले आहे की,  मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे ‘फक्त’ रात्रीस खेळ चाले…दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच्या वेळेस एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.

“ही काही पहिली वेळ नाही. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे, आणि प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मुळात कोणतीही निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, अथवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असो, या सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात. परंतु, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करून रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जाहीर निषेध करते. निवडून आलेले सिनेट सदस्य हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतात. त्यामुळेच या निवडणुकांचे गांभीर्य विद्यापीठाला लवकरात लवकर समजले तर बरे होईल”.

हे देखील वाचा : जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः केली स्वच्छता; समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “मागील वेळीसुद्धा जेव्हा विद्यापीठाने निवडणुका रद्द केल्या होत्या, तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत मुंबई विद्यापीठाच्या अनाकलनीय कारभाराचा जाहीर निषेध केला होता. मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे. म्हणूनच यावेळी जेव्हा मुंबई विद्यापीठाने पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकांचा सखोल अभ्यास केला आणि निवडणुका कायद्याला धरून नसल्याचे लक्षात आल्याने, त्या पुन्हा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता आधीच व्यक्त केली. माझे सहकारी निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत, त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला.”

“काल मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, हे पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, ही अपेक्षा व्यक्त करतो !!!”

Web Title: Amit thackeray criticized administration of mumbai university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 11:20 AM

Topics:  

  • amit thackeray
  • Mumbai University

संबंधित बातम्या

आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठ प्रथम! विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग
1

आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठ प्रथम! विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Yemen Partition: येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर; दक्षिणेकडील गट STCने जारी केले आपले संविधान, Saudi Arabiaने सुरू केले बॉम्बस्फोट

Yemen Partition: येमेन विभाजनाच्या उंबरठ्यावर; दक्षिणेकडील गट STCने जारी केले आपले संविधान, Saudi Arabiaने सुरू केले बॉम्बस्फोट

Jan 03, 2026 | 09:45 AM
Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

Jan 03, 2026 | 09:36 AM
Women’s Liberation: जेव्हा 4,000 महिलांनी लंडन हादरवलं; 1971 चा ‘तो’ क्रांतिकारी मोर्चा, ज्याने बदललं स्त्रियांचं नशीब

Women’s Liberation: जेव्हा 4,000 महिलांनी लंडन हादरवलं; 1971 चा ‘तो’ क्रांतिकारी मोर्चा, ज्याने बदललं स्त्रियांचं नशीब

Jan 03, 2026 | 09:22 AM
Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

Jan 03, 2026 | 09:21 AM
भाजपसह काँग्रेससमोर अंतर्गत बंडाचं मोठं आव्हान; बंडखोरांपेक्षा नाराज कार्यकर्ते घातक

भाजपसह काँग्रेससमोर अंतर्गत बंडाचं मोठं आव्हान; बंडखोरांपेक्षा नाराज कार्यकर्ते घातक

Jan 03, 2026 | 09:21 AM
Paush Purnima: पौष पौर्णिमेला आकाशात झळकणार पूर्ण चंद्र, जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

Paush Purnima: पौष पौर्णिमेला आकाशात झळकणार पूर्ण चंद्र, जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

Jan 03, 2026 | 09:19 AM
Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

Jan 03, 2026 | 09:18 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.