सौजन्य - amitrajthackeray माझ्या जनतेने दिलेला कौल मला मान्य, अमित ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Assembly Result 2024 : महाराष्ट्राच्या हायव्होल्टेज विधानसभा निवडणुकीचे आज निकालसुद्धा विरोधकांना अनाकलनीय असेच होते. भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर आघाडीची यावेळी चांगलीच गोची झाली. तर यासर्वांमध्ये सर्वांचे लक्ष्य वेधून घेणारा आणखी एक मोठा पक्ष होता तो म्हणजे राज ठाकरेंचा मनसे. परंतु, मनसेला स्पष्टपणे महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्याचे पाहायला मिळाले.
जनतेचा कौल मान्य
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीचा झंझावात पाहायला मिळला. महायुतीला तब्बल 231 जागा मिळाल्या आहेत. तर मविआला 45 जागा मिळाल्या. 133 जागांवर आघाडी मिळवत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपचे हे यश आजपर्यंतचे सर्वात मोठे यश ठरले आहे. यामध्ये मनसेला महाराष्ट्रात आपले खातेसुद्धा उघडता आले नाही. मनसेचा एकही उमेदवार या निवडणुकीत निवडून आला नाही. यावर राज ठाकरे यांनी अविश्वसनीय एवढीच प्रतिक्रिया दिली, तर अमित ठाकरे यांनी ट्विट करीत माझ्या जनतेने दिलेला कौल, मी नम्रपणे स्वीकारतो, असे म्हटले.
माहिमच्या पराभवानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया
माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…
आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. pic.twitter.com/0zLkpi7ZNQ
— Amit Thackeray (@amitrthackeray) November 23, 2024
हेही वााचा : वाई मतदारसंघात मकरंद आबांचा बोलबाला; मकरंद पाटील यांचा विजयी चौकार; ६१ हजारहून अधिक मताधिक्य
राज ठाकरे ठरले अपयशी
एरवी राज ठाकरेंच्या सभेला नेहमीप्रमाणेच तुफान गर्दी पाहायला मिळाली. परंतु, त्याचे मतात रूपांतर करण्यात ते कमी पडले असेच म्हणावे लागेल. त्यांचा एकही उमेदवार यावेळी निवडून आला नाही. खुद्द राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेसुद्धा माहीममध्ये अपयशी ठरले. त्यांना 33062 मते पडली तर उद्धव ठाकरेंचे उमेदवार 50213 मते घेऊन विजयी झाले. तर शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरसुद्धा पराभूत झाले. त्यांना 48897 मते पडली. आपला पराभव मान्य करीत अमित ठाकरेंनी ट्विट यावर ट्विट करीत प्रतिक्रिया दिली.
वरळीत आदित्य ठाकरेंनी गड राखला
पण, आदित्य ठाकरेंच्या या विजयात काका राज ठाकरे यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटलं जात आहे. राज ठाकरे नसते तर आदित्य ठाकरे यावेळी विधानसभेत पोहोचू शकले नसते. आदित्य ठाकरे यांच्या वरळीच्या जागेवर तिरंगी लढत होती. या जागेवरून शिवसेनेच्या शिंदे गटाने मिलिंद मुरली देवरा यांना उमेदवारी दिली होती. आदित्य ठाकरे यांना ६०,६०६ तर मिलिंद देवरा यांना ५२,१९८ मते मिळाली. आदित्य केवळ 8408 मतांनी विजयी झाले.
निवडणुकीचे निकाल धक्कादायक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत. महायुतीच्या एकतर्फी विजयात अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला केवळ 58 जागा मिळत आहेत. त्यातही काँग्रेस 15, शिवसेना 27 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट 11 जागांवर विजयी होताना दिसत आहे. त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे ही मोठी नावे आहेत. आदित्य ठाकरे वरळीतून, तर अमित ठाकरे मुंबईत माहीममधून निवडणूक लढवत होते. वरळीतून आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत तर माहीममधून अमित पराभूत झाले आहेत.
संदीप देशापांडे मनसेकडून वरळीतले उमेदवार
आता यात राज ठाकरेंची भूमिका काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातून संदीप देशपांडे यांना येथून उमेदवारी दिली होती. देशपांड यांना 18858 मते मिळाली आहेत. देशपांड यांनी कुठेतरी महाविकास आघाडीविरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचे काम केले. एमव्हीए विरोधी मतांचे विभाजन झाले नसते तर आदित्य ठाकरेंना अवघड गेले असते. म्हणजे शेवटी काकांनी आदित्यला विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा केला.
हेही वाचा : मुलाचा पराभव लागला जिव्हारी, जनतेला उद्देशून राज ठाकरेंनी केले ट्विट, म्हणाले….अविश्वसनीय!