Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका

गतवर्षी दमदार पावसाळा होऊनही यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या तंबीनंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अखेर दुसऱ्या टप्प्याचा कृती आराखडा सादर केला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 07:43 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता
  • तालुक्यांमध्येच भूजलपातळीत वाढीचे प्रयोजन
  • अर्धवट कामांचा फटका
Amravati News : गतवर्षी दमदार पावसाळा होऊनही यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या तंबीनंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अखेर दुसऱ्या टप्प्याचा कृती आराखडा सादर केला असून जानेवारी ते जून या कालावधीत किमान ७०६ गावांना पाणीटंचाईचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संभाव्य टंचाई निवारणासाठी ७१८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यावर सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंदा मेळघाटसह ४ तालुके वगळता उर्वरित १० तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली होती. तसेच ५६ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

भूजल पुनर्भरणाला चालना

ऑक्टोबरपर्यंत सातत्याने पाऊस झाल्यामुळे भूजल पुनर्भरणाला चालना मिळाली आणि भूजलपातळी वाढल्याने यंदा पाणीटंचाई भासणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, जीएसडीएच्या अहवालानुसार केवळ एक-दोन तालुक्यांमध्येच भूजलपातळीत वाढ झाली, तर तेवढ्याच तालुक्यांमध्ये घट नोंदली गेली. उर्वरित १० ते १२ तालुक्यांमध्ये भूजलपातळी स्थिर राहिली. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यात पाणीटंचाई जाणवली नाही; परंतु जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात टंचाईची शक्यता अधोरेखित झाली आहे. संभाव्य टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेंतर्गत प्रत्येक पंचायत समितीकडून कामांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
त्यानुसार सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. निश्चित आर्थिक मर्यादेत जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार असल्याने कामे मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. मात्र, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यासच उपाययोजना प्रभावीपणे राबविणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाकडून
सांगण्यात येत आहे.

१३२ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण

मार्चपश्चात जिल्ह्यातील १३२ गावांमध्ये १४३ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. हा किमान २५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ५१
गावांमधील विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार आहे. स्रोतांच्या बळकटीकरणावर १३६ गावांमध्ये २.६९ कोटींचा खर्च होणार आहे.

२१ गावात नवीन ९७ विंधनविहिरी

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील ९१ गावांतील नवीन १७ विधनविहिरी व कूपनलिका तयार करण्यात येणार आहे. यासाठी किमान १.१३ कोटीचा खर्च होणार आहे. शिवाय २८२ गावांत २८६ नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. याशिवाय चार गावांमध्ये तात्पुरत्या पूरक योजना घेण्यात येणार आहे.

अर्धवट कामांचा फटका

दर उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, अनेक गावांत ही कामे अजूनही पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे यावर्षीही ग्रामीण भागाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

अशी आहे उपाययोजना

विंधनविहिरी 97, नळ योजना दुरुस्ती 97, पूरक नळ योजना 4, प्रस्तावित टैंकर 15, विहिरी खोल करणे 51, विहिरीचे अधिग्रहण 143

Amravati News: बँकेतून १३ लाखांचे सोने गायब!, निर्मल उज्ज्वल सोसायटीत मोठी खळबळ

Web Title: Amravati drought relief plan 706 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Water Crisis : पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’
1

Water Crisis : पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
2

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Koregaon Water Crisis: कोरेगावात ‘तळहीरा’ तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ८ दिवसांत पाणी संपण्याची भीती
3

Koregaon Water Crisis: कोरेगावात ‘तळहीरा’ तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ८ दिवसांत पाणी संपण्याची भीती

Amravati News: वन्यप्राण्यांच्या दहशतीने शेती संकटात! पिकांचे नुकसान मोठे, भरपाई मात्र अपुरी; शेतकरी हवालदिल
4

Amravati News: वन्यप्राण्यांच्या दहशतीने शेती संकटात! पिकांचे नुकसान मोठे, भरपाई मात्र अपुरी; शेतकरी हवालदिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.