अमरावती : अमरावतीत (Amravati) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून आयुक्तांवर शाईफेक केल्या प्रकरणी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेरीस या प्रकरणात रवी राणा यांना आज अमरावती जिल्हा न्यायालयाने (Amravati District Court) अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे रवी राणा अधिवेशनात हजर राहणार आहे.
अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून अमरावतीमध्ये वाद निर्माण झाला होता. रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केल्या प्रकरणी ५ जणांना पोलिसांनी अटक केली होती. तसंच रवी राणा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता.
[read_also content=”‘जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही, झुंड सिनेमा म्हणून पाहा’ – केदार शिंदेच्या ट्विटची चर्चा https://www.navarashtra.com/latest-news/new-release-movies/kedar-shinde-tweet-about-jhund-movie-nrsr-249810.html”]
रवी राणा हे गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेले होते. अटक टाळण्यासाठी रवी राणा यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणी कोर्टाने रवी राणा यांना दिलासा देत अटक पूर्व जामीन अर्ज स्वीकारला आहे.
कोर्टातून बाहेर पडल्यानंतर रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले. पोलीस आयुक्तांनी पालकमंत्र्यांच्या दबावात माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, घटनेवेळी मी दिल्लीत होता पण माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे मी आता अमरावती पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसाठी विधानसभा सभागृहात मागणी करणार आहे, असं रवी राणा म्हणाले.