छत्रपती संभाजीनगर : राष्ट्र उभारणीसाठी पंचतत्वाचे एकात्मिक रक्षण करण्याचा नैतिक संकल्प करत संत पूजनाने राष्ट्रीय संत संमेलनाची (National Sant Sammelan) उत्साहात सुरुवात चिकलठाण येथील श्री शनी आश्रमात शनिवारी झाली. देशभरातील विविध संत, महंत पीठाधीश्वर, महामंडलेश्वरांची उपस्थिती होती. देशभरातील सहाशेहून अधिक संतांचा सहभाग असलेल्या या राष्ट्रीय संत संमेलनाची सुरुवात संत पूजनाने करण्यात आली. श्री शनी आश्रमाच्या संस्थापक संचालिका श्री शनी साधिका, डॉ. विभाश्री दीदी यांनी सर्व उपस्थित संतांचे अध्यात्मिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.
संमेलनाची सुरुवात सत्यम शिवम सुंदरम या गाण्याने सुरुवात झाली. यानंतर डॉ. विभाश्री दीदी यांनी संमेलनाच्या प्रास्ताविकतात संमेलनाचे आयोजनाचे उद्दिष्टे सविस्तरपणे मांडली. यामध्ये पंचमहाभूते हे आपल्या सृष्टीसाठी किती गरजेचे आहेत यावर प्रकाश टाकला व राष्ट्र उभारणीत संतांच्या भूमिकेसाठी चिकलठाणा परिसरातील श्री शनी आश्रम येथे २४ ते २६ जून दरम्यान राष्ट्रीय संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी महामंडलेश्वर रामसुंदर दास म्हणाले की, पंचमहाभूतांचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपला किंवा आपल्या कुटुंबातील कुणाचाही वाढदिवस असेल त्यादिवशी एक झाड अवश्य लावावे. आपली ऋषी आणि कृषी जपणारी संस्कृती आहे. आज जैविक शेती करणे गरजेचे असून, यासाठी गोमाता रक्षण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात श्री शनी आश्रमाच्या संस्थापक ज्योतिषाचार्य तथा शनी साधिका डॉ. विभाश्री दिदी यांच्या निमंत्रणावरून महाराष्ट्रातील 500 नामवंत संतांव्यतिरिक्त अनेक राज्यांतील 100 हून अधिक स्वामी, महाराज, सद्गुरु उपस्थित झाले आहेत.
तसेच भारताचे पीठाधीश, महामंडलेश्वर संत ही या संमेलनात सहभागी होणार आहेत. यावेळी कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराज, हभप अमृताश्रम स्वामी, स्वामी विद्या नामदेव तीर्थ, स्वामी आर्य शशानंद धारूरकर, स्वामी सुरत गिरी महाराज, स्वामी हरीषानंद महाराज, स्वामी महेशानंद पुरी, महामंडलेश्वर राजश्री महूर, राम सुंदरदास महाराज, स्वामी महेशानंद पुरी महाराज, स्वामी ईश्वरलिंग महाराज, माता भारतीदिदी पुरी, साध्वी सोनोली ताई गिरी, रसानंद पुरी दिदी, दयानंद पुरी जिंतूर, भागवताचार्य धर्मदूत महाराज, महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज, शनि तीर्थ वीरजापुरचे छगन शर्मा, स्वामी चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, निर्मल दास महाराज वैष्णव, पद्मश्री सद्गुरु ब्रह्मशानंद स्वामी, साहेबराव शास्त्री, लोकेश नंद पुरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलानाने या राष्ट्रीय संत संमेलनाची अध्यात्मिकरित्या सुरुवात झाली.
यावेळी रामसुंदर दास म्हणाले की, संमेलनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी नक्कीच साकार होतील. यामुळे डॉ. विभाश्री दीदी यांचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज भाविकांना उपदेश करताना म्हणाले, पंचमहाभूताशिवाय जीवन संभव नाहीये, यामुळे यांची रक्षा करणे आपले आद्य कर्तव्य आहे. साधुसंत म्हणताना ठरवले तर नक्कीच यामध्ये मोठी क्रांती होईल. या क्रांतीमधून नक्कीच पंचमहाभूतांचे रक्षणाचे उद्दिष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. उपस्थित असलेल्या सर्व संत महंत व भाविकांचे आभार डॉ. विभाश्री दीदी यांनी मानले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सारा बिल्डरचे सिताराम अग्रवाल माजी नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी डॉ. विभाश्री दीदी लिखित पुस्तक संतांना भेट म्हणून दिले.