यंदा आनंदाचा शीधा' नाही, तर शीवभोजन थाळीत काटकसर; लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका
Anandacha Shidha: राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या इतर योजनांवर आर्थिक ताण येत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अशातच लाडकी बहीण योजनेमुळे आणखी एका योजनेमुळे आणखी एका योजनेला धक्का बसणार आहे. यंदाच्या दिवाळीला ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या खर्चामुळे ‘आनंदाचा शिधा’ योजना यंदा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘आनंदाचा शिधा’ ही रक्षाबंधनानिमित्त गरीब भगिनींसाठी राबवली जाणारी योजना आहे. मात्र, यंदा सरकारकडून लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्यामुळे अन्य योजनांना ब्रेक लागण्याची चिन्हं आहेत. तसेच, स्वस्त दरात भोजन पुरवणाऱ्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेचाही खर्च कमी करण्याची शक्यता असून, काही ठिकाणी थाळींची संख्या किंवा अनुदानात कपात होऊ शकते. त्यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
यंदा दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ आर्थिक मर्यादांमुळे रद्द करण्यात आला आहे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने हा शिधा वितरित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांवर होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून सणासुदीच्या काळात ‘आनंदाचा शिधा’ योजनेंतर्गत आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येत होत्या. मात्र, यंदा ही मदत थांबणार आहे.
तसेच, स्वस्त दरात गरजूंसाठी भोजन पुरवणाऱ्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेतही यंदा आर्थिक टंचाईमुळे अडथळे निर्माण झाले आहेत. या योजनेसाठी आवश्यक असलेला सुमारे ६० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. मात्र, सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाला केवळ २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे योजना पूर्वीप्रमाणे राबवण्यात अडचणी येत आहेत. सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठा ताण आला आहे. त्यामुळे अन्य सामाजिक योजना वित्तीय संकटात सापडत आहेत. याचा सर्वसामान्य गरजू नागरिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Genelia D’souza Birthday: एका जाहिरातीमुळे जिनिलीयाने मिळवली प्रसिद्धी; जाणून घेऊया रितेश
‘आनंदाचा शिधा’ योजना नेमकी काय आहे?
‘आनंदाचा शिधा’ ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली. गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात थोडा दिलासा मिळावा या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा 2022 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये एक किलो चणा डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता. ही किट लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयांत देण्यात येत होती.
2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी यावेळीही या किटचे वितरण करण्यात आले. तसेच, 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तही ‘आनंदाचा शिधा’ पुरवण्यात आला होता. ही योजना गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त ठरली होती. मात्र, यंदा आर्थिक अडचणींमुळे सरकारकडून या योजनेवर ब्रेक लावण्यात आला आहे.