Photo Credit- Social Media 'हे भाजप चे केवळ दबावतंत्र आहे का?' नारायण राणेंच्या दाव्यावर दमानियांचा थेट सवाल
बीड : राज्यामध्ये अत्याचारांच्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. बीडमधील कायदा हातात घेतलेले अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत. यामुळे बीड, जालनामधील प्रशासन, पोलीस आणि राजकारण्यांवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याने एका तरुणाला नग्न करुन अमानुषपणे मारहाण केली आहे. यावरुन आता अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली आहे.
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. मारहाण करणारा आरोपी हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यानंतर सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. “याप्रकरणी सुरेश धसांनी स्टेटमेंट द्यावे, या कार्यकर्त्यावर काय कारवाई करत आहात ते सांगावं. नाहीतर उद्या उठून हाही दुसरा वाल्मिक कराड बनेल,” अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
“मी काही व्हिडीओ माझ्या सोशल मीडियावर टाकले आहेत. रक्तबंबाळ झालेल्या माणसाचे दात सतीश भोसलेने पाडले आहेत. भोसलेवर आजच्या आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुरेश धसांना तो बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो. तो सरकार म्हणतो. सुरेश धस यांनी यावर खुलासा करावा. हे सर्व एका माळेचे मनी आहेत. त्या भोसलेच्या प्रत्येक व्हिडीओत आणि फोटोत त्यांच्या हातात सोनं आहे. गळ्यात सोनं आहे. मी बाई असून माझ्या हातात सुद्धा सोन्याच्या बांगड्या नाहीत. यांच्याकडे कुठून आलं येवढं सोनं? सुरेश धस यांनी स्टेटमेंट द्यावं. या कार्यकर्त्यावर काय कारवाई करत आहात. उद्या तो वाल्मिक कराड होईल. हे लोक वाटेल तसं लोकांना मारत आहेत. सुरेश धस कोण आहे हा सतीश भोसले?” असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
हे काय आहे काय ?
गृहमंत्र्यांनी आणि श्री सुरेश धस यांनी उत्तर द्यावे.
हा मारणारा माणूस सुरेश धस चा कार्यकर्ता आहे का ?
बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा
अँकर – बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा वीडियो पहा.
अद्याप शिरूर पोलीस… pic.twitter.com/aAO4s9vedx
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 5, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर बोललं पाहिजे. नाही तर मी अधिवेशनाबाहेर प्रोटेस्ट करणार आहे. आजचा दिवस मी वाट पाहीन. उद्या सकाळपासून मी ठिय्या देणार आहे. मी हे सर्व फोटो घेऊन बसणार आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. बास झाले हे सर्व धंदे महाराष्ट्रात अशी दहशत नको,” अशी आक्रमक भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे.