छ. संभाजीनगर : लोकशाही, संविधान, घटना रक्षणासाठी ही वज्रमूठ निवडणुकीत मतदानासाठी वापरा. संघर्ष करून लढून मिळवलेले स्वातंत्र्य (Independance) घाबरून सोडणार का? आपल्या देशासाठी त्याने बलिदान केले. धर्म कोणताही असो, त्याने देशासाठी बलिदान केले. आपल्या लष्करातील जवान औरंगजेब याचे अपहरण करून त्याला मारण्यात आले. माझे आजोबा आणि वडिलांनी सांगितले तेच मी सांगतो, आदित्यही (Aditya Thackeray) तेच सांगेल. आम्हाला शिकवायला जाऊ नाका, आमचा विचार स्पष्ट आहे अशा ठाकरी शैलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि मिंधे सरकारवर (Shinde Fadnavis Government) छत्रपती संभाजीनगर येथील सभेत बोतलाना वज्रप्रहार केला.
ते स्वातंत्र्यच आता धोक्यात आले आहे. त्यासाठी आपल्याला वज्रमूठ करावी लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १४ वर्षे यातना सोसल्या, ते देश स्वतंत्र करण्यासाठी केले. शिवसेनेने मोठी केलेली माणसे गेली, मात्र, मोठी करणारी माणसे आपल्यासोबत आहेत. आता हेच दगड घेऊन तुम्ही निवडणुका लढणार आहात का? आम्ही मनावर दगड ठेवत हा निर्णय घेतला आहे, असे भाजपने म्हटले आहे.
प्राण जाये पर वचन न जाय, हे आमचे हिंदुत्व आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन, हे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते, ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्या हातात भगवा शोभत नाही. भगवा आणि हिंदुत्वाचा अपमान करू नका. शिवसेनेत असताना त्यांनी असे केले असते तर त्यांना तेव्हाच पक्षातून हाकलले असते.
तुमचा मंत्री सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्याबाबत अपशब्द वापरतात, हेच त्यांचे हिंदुत्व आहे काय? लालूप्रसाद यादव यांच्या सुनेची ती बेशुद्ध होईपर्यंत चौकशी केली जाते, हेच त्यांचे हिंदुत्व आहे का? कोरोना काळात राजेश टोपेंनी चांगले काम केले, त्यांना औषधांची नावे पाठ होती, सध्याच्या आरोग्यमंत्र्यांबाबत काय बोलणार?
[read_also content=”हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे- अजित पवार https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-fadnavis-government-is-mocking-the-farmers-ajit-pawar-in-mva-vajramuth-meeting-in-chatrapati-sambhajinagar-nrvb-380426.html”]
सभेमध्ये तुम्ही भाषणा वाचू का असे विचारतात. मात्र, जनता मतदानासाठी उतरेल तेव्हा तुम्ही वाचू शकणार नाही. तुमच्या सभेला तुम्ही खुर्च्या भाड्याने आणतात, माणसे तुम्ही भाड्याने आणू शकत नाही. ती माणसे शवटपर्यंत थांबत नाही मोदींचे नाव घेऊन तुम्ही मैदानात या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे. मी माझ्या वडिलांचे नाव सोडणार नाही.
त्यांनी आपला पक्ष चोरला आहे, चिन्हही चोरले आहे, आता ते माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपची पालखी वाहण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली नाही. आपला वापर त्यांनी केला आहे. भाजप राजकारणात अस्पृश्य असताना आम्ही भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले. कोरोना काळात आपण घरात बसून जे काम केले, ते तुम्ही वणवण फिरुनही करू शकत नाही. आम्ही दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले होते.ते शोतकऱ्यांना मिळाले आहे. आम्ही जे बोललो तर केले, आम्ही फसवाफसवीचे काम केले नाही.
पीकविम्याच्या नावाखाली फक्त १० रुपयांचा चेक देण्यात येतो. अवकाळीने शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने फक्त घोषणा केल्या आहेत. आपल्याही देशात जनतेने एकवटले आहे. घटनेचे रक्षण करण्यासाठी आमचे मावळे समर्थ आहेत. जनतेचा रेटा बघून त्यांना त्यांचे प्रयत्न सोडावे लागले, अशी लोकशाही असायला हवी. असाच प्रयत्न इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी केला होता, त्यावेळी जनता त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली होती.
देशातील लोकशाही यांच्या हातात आली ,तर देशातील लोकशाहीला आपल्याला श्रद्धांजली वाहावी लागेल. भाजपला न्यायव्यवस्थेवरही अधिकार स्थापन करायचा आहे. लोकशाही ही इस्त्रायलसारखी असायला हवी. त्यांनी वाळवंटातही शेती केली. तुम्ही त्यांचा आदर्श ठेवत पाकव्याप्त कश्मीर जिंकून दाखवा सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीसी कारवाई करून मराठवाडा देशात आणला जमीन दाखवायची असेल, पाकव्याप्त कश्मीरची जमीन जिंकून दाखवा, आहे तुमच्यात हिंमत? आपल्या देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
देशातील लोकशाही संपवायची, आपल्या पक्षाशिवाय एकही पक्ष राहता कामा नये, हेच त्यांचे धोरण आहे. एकेकाळी भाजपच्या व्यासपीठावर सांधीसंत असायचे. आता त्यांच्या व्यासपीठावर सर्व संधीसाधू आहेत. देशातील सर्व भ्रष्ट माणसे भाजपमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी पक्षांचे नाव भ्रष्ट जनता पार्टी करावे. आता भाजपने ज्या संगमा यांच्यावर आरोप केले होते, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करून तुम्ही त्यांचे काय चाटत आहात. आज देशात जी परिस्थिती आहे, विरोधी पक्षांचा नाहक छळ सुरू आहे.
मोदी म्हणतात, मेरी प्रतिमा खराब करने का काम चल रहा है, हे सर्व कोण करतेय,याचा त्यांनी विचार करावा. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटले असे म्हटतात तर सत्तेसाठी तुम्ही मिंध्याचे काय चाटत आहात सत्तेसाठी आम्ही एकत्र होतो, असा आरोप करतात मात्र सत्ता गेल्यावरही आम्ही एकत्र आहोत. महाविकास आघाडीचे सरकार ज्या पद्धतीने पाडले, ते तुम्हाला मंजूर आहे का? महाविकास आघाडीचे सरकार तुमची कामे करत होते काय?
[read_also content=”‘…मग तुम्ही मिंधेंचं काय चाटताय? नितीशकुमारांचं काय चाटतं होता?’; उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackeray-criticizes-on-cm-eknath-shinde-and-bjp-in-mahavikas-aghadi-meeting-nrka-380425.html”]
पंतप्रधानांची पदवी मागितली तर २५ हजाराचा दंड होतो, अशी कोणती पदवी आहे तुमच्याकडे? तुम्ही सांगाल तो हिंदू, तुम्ही सांगाल तो देशद्रोही, ही तुमची मस्ती गाडण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ उभी आहे. आमच्या हिंदुत्वाचे मोजमाप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
आपण काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असे म्हणता, मग मेहबुबा मुक्तीसोबत तुम्ही सरकार स्थापन केले तेव्हा तुम्ही काय सोडले होते. आम्ही हिंदुत्व सोडल्याचे एकतरी उदाहरण द्या, उद्धव ठाकरे यांचे आव्हान. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोणत्याही धर्मीयांवर आक्रोश करण्याची वेळ आली नाही. सर्वोच्च नेता पंतप्रधान असताना हिंदूना आक्रोश करावा लागत आहे. त्या नेत्यांची शक्ती काय कामाची? आता हिंदू आक्रोश मोर्चा, गौरव यात्रा काढत आहे.
समाजात तेढ निर्माण करून निवडणुकीत वातावरण तापवत आहेत. ते काहीही करत नाही, फक्त कोंबेडे झुजवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. जे भाडपला जमले नव्हते, ते महाविकास आघाडीने करून दाखवले आहे. त्याचा अभिमान आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे नामकरण केले आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिले. या ठिकाणी आपण आलोय तेव्हा गर्दी असते. आजही येथे जनतेचा महासागर दिसत आहे.