मुंबई : महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान, यावर आता विरोधक आक्रमक होत शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnvis government) टिका करत आहेत. सरकारच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन काढत असताना, आता सत्ताधारी सुद्धा आक्रमक होत पलटवार करत आहेत. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद (Ashish shelar pc) घेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व शिवसेनेवर (Shivsena) टिकास्त्र सोडले आहे. ज्या जलदगतीने आघाडी सरकारने विदेशी दारूला कर सवलती दिल्यात त्याच जलदगतीने फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून कर सवलती दिल्याचा कागदोपत्री एखादा पुरवा दाखवा, असे आव्हान देत मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा जोरादार हल्लाबोल केला. (Ashish shelar press conference)
[read_also content=”…तर पंतप्रधान मोदी माझी माफी मागतील का? मनीष सिसोदिया यांचा मोदींना सवाल https://www.navarashtra.com/india/pm-narendra-modi-sorry-say-to-me-manish-sisodia-326264.html”]
दरम्यान, याप्रकरणी उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांची पेग्विनसेना भ्रम निर्माण करून मराठी माणसाला थापेबाजी आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्व निर्माण करायचे काम करीत आहे, असा आरोपही आमदार आशिष शेलार यांनी केला. आज वांद्रे येथे भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्पावरुन शिवसेनेवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी आमदार अॅड आशिष शेलार पुढे म्हणाले की, पेंग्विन सेनेकडून या घटनेबाबत भ्रम निर्माण केला जातो आहे. पेंग्विन सेना जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होता तर, या प्रकल्पाची पायाभरणी, भूमिपूजन झालं होतं का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे.
फॉक्सकोन आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होता तर तो गुजरातला नेला गेला तर राज्यात तो होता कधी? त्याच्या जागेचा प्रश्न सोडवला कधी? करारनामा झाला कधी? या प्रश्नांची उत्तर आम्हाला पेंग्विन सेनेकडून हवी आहेत. केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्यांना हिणवणार असाल आणि घालून पाडून बोलणार असाल तर माझी मुख्यमंत्र्याना विनंती आहे की, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर पेंग्विनसेना देत नसेल तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा.