जिद्द आणि मेहनत असेल तर तुमच्यासमोर आकाशी ठेवणं पडू शकत हे हिंगोलीच्या शेतकरी पुत्राने करून दाखवल आहे. जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या मॅसुचुसेस्टस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठात सेनगाव तालुक्यातील काकर येथील शेतकरी कुटुंबातील आकाश पोपळघट या विद्यार्थ्यांची निवड झालीय.
दरवर्षी जगातील ४० विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. कहाकर या खेडेगावातील आकाशचे वडील गजानन पोपळघटे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. तर आई लक्ष्मी या गृहिणी आहेत. आकाश हा बालपणापासूनच अभ्यासामध्ये अव्वल होता. गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथीपर्यंत शिकला नंतर रिसोड व त्यानंतर राजस्थानमधील कोटा येथे शिक्षण घेतले. येथे आकाशच्या ज्ञान कक्षेला आकाशी ठेंगणे पडू लागले.
विविध अभ्यासक्रमांची माहिती मिळाली. सेटओलंपियाड सारख्या अनेक स्पर्धा परीक्षा व जीईई मेन्स, ऍडव्हान्सची तयारी केली. एमआयटीला अर्ज करता येतो हे आकाशला कळाले. त्यासाठी रोज १८ तास अभ्यास करून या परीक्षेत आकाशने यश मिळाले. त्यानंतर एमआयटीसाठी अर्ज केला त्याचीही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तो प्रवेशात पात्र ठरल्याचे पत्र मिळाले.
यामुळे त्याचा शिक्षणावरचा काही भार हलका होणार आहे. एरोस्पेस व फिजिक्समधील या अभ्यासक्रमानंतर चांगल्या पगाराचा मोठा हुद्दा मिळणार हे नक्की आहे.