लातूर : पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या एका कुटूंबातील युवती लातूरात शिक्षण घेत होती. महिनाभरापूर्वी ती पुण्याहून लातूरला परिक्षेसाठी आली. यावेळी ती तिच्या आत्याच्या घरी मुक्कामी होती. या काळात आत्याच्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून संशयित आराेपीस अटक करण्यात आली आहे.
विवेकानंद चौक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मूलगी इयत्ता १२ वीची परिक्षा देण्यासाठी लातूर येथे तिच्या आत्याच्या घरी आली हाेती. १२ फेब्रुवारीस संबंधित मुलगी मध्यरात्री झोपेत असताना तिच्यावर अत्याच्या पतीने अत्याचाराचा प्रयत्न केला. परंतु पिडीत मुलीने विरोध केल्यामुळे त्याने तिची माफी मागितली. त्यानंतर ३ मार्चला दुपारी अडीचला ती घरात एकटी असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला.
[read_also content=”न्याय हाच संविधानाचा सर्वात मोठा संदेश : जयदेव डोळे https://www.navarashtra.com/maharashtra/justice-is-the-biggest-message-of-the-constitution-jaydev-dole-nrdm-269066.html”]
दरम्यान या घटनेनंतर मुलगी पुणे येथे गेली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने तिच्यासमवेत लातूर येथे मंगळवारी विवेकानंद चौक पोलिसांत संबंधित संशयित आराेपी विरुद्ध तक्रार दिली. त्यानूसार त्याला अटक करण्यात आली आहे.






