Baramati News: जे'जेन झी'चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
जेजुरीगड दसरा मेळावा संयोजन समितीच्या वतीने दुपारी १२ वाजता निरा रोडवरील मल्हार नाट्यगृहात हा सोहळा होणार आहे. संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याचे यंदा दहावे वर्ष आहे.
Supreme Court : संजय राऊत आणि निखिल वागळेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाकडून अवमानना नोटीस जारी
‘ जेन झी चे भविष्य, सामाजिक न्याय आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प!’ ही यंदाच्या मेळाव्याची प्रमुख संकल्पना आहे. शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून तरुणांना उपलब्ध होणाऱ्या संधींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बदलत्या काळात युवकांना सक्षम बनविणे, त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविण्याचा संदेश या सोहळ्यातून दिला जाणार आहे.
युवकांच्या भविष्याशी निगडित शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, पाणी व्यवस्थापन, आरक्षण, वंचित घटकांना समान संधी आणि ग्रामीण विकास या महत्त्वाच्या विषयांवरही मेळाव्यात भर दिला जाणार आहे. सामाजिक न्यायाची भूमिका अधिक व्यापक करताना ग्रामीण भागातील तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि प्रगतीच्या संधी निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली जाणार आहे.
जेजुरीगडचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपत सामाजिक ऐक्य, महाराष्ट्राची अस्मिता आणि आधुनिक, सक्षम समाजनिर्मितीचा विचारही या दशकपूर्ती सोहळ्यात मांडण्यात येणार आहे.
दहा वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे युवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच धर्म-संस्कृती आणि समाजहितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. पुढील दशकात युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला जाणार आहे.या मेळाव्यास युवक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, शेतकरी, उद्योजक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जेजुरीगड दसरा मेळावा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.






