पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार घडला. वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. हुंडा आणि सतत पैसे मागण्याच्या ह्याने आणि सासऱ्याच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. या प्रकरणानंतर बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. मात्र अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलिसांनी ही पत्रकार परिषद गुंडाळल्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहे.
मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. गेल्या सात दिवसांपासून हे दोघेही फरार होते. अखेर आज पहाटे बावधान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आरोपी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये काही मित्रांसोबत जेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक केली होती. पण सात दिवसांपासून हे दोघे तळेगाव परिसरातच लपून बसले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने दोघानांही ताब्यात घेतले. यानंतर बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
वैष्णवी हगवणे पुणे क्राईम केसच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
बावधन पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांची पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी घटनेचा क्रम आणि माहिती दिली आहे. “बावधान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबातील तीनजण अटकेत होते, उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गादर्शनसाठी सहा पथके तैनात करण्यात आली होती. त्या पैकी राजेंद्र हागवणे (वैष्णवीचे सासरा) आणि सुशील हगवणे (वैष्णवीचा दीर) यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर पीसीआरसाठी हजर केले जाणार आहे.” अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली आहे.
अधिकारी लगेच जागेवरुन उठले
पुढे पोलिसांनी माहिती दिली की, “सर्व पुरावे संकलित करून घेतले जात असून हे पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार केला जाईल. या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एन्डला दोषसिद्धी नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आलेल्या आहेत, अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली. मात्र इतकं बोलून पोलीस अधिकारी जागेवरून उठून निघून गेले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील हुंडाबळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण या बाबी देखील विचारल्या जात आहेत. यावर आता राज्यभरातून रोष व्यक्त केला जात असताना पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. यानंतर माध्यमांना कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारता आले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.