बीड : अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आपण कितीही प्रतीकूूल परिस्थितीतून मार्ग काढत यश मिळू शकतं असं नेहमी बोललं जातं. याचीच प्रचिती आली आहे. बीड जिल्ह्यातील शिदोड गावाला. येथील शेतकऱ्याच्या मुलाने परिश्रमाच्या जोरावर थेट एमपीएससी परीक्षेत थेट पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ज्ञानेश्वर नंदलाल देवकते असं या युवकाचं नाव आहे.
बीडच्या शिदोड येथील ज्ञानेश्वर नंदलाल देवकते या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. शेजारील शेतकऱ्याच्या शेळ्या राखून त्यातून मिळालेल्या रोजगारातून त्याने शिक्षण पूर्ण केले आणि एमपीएससी परीक्षेत थेट पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशामुळे संपूर्ण शिदोडमध्ये आंनदाचं वातवरण आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गावातील तरुण फौजदार झाल्याने ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून गावात जंगी मिरवणूक काढली. ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीत अख्खे गाव सहभागी झाले होते. ज्ञानेश्वरचे कुटुंब ऊसतोड मजूर आहे. ज्ञानेश्वर मिळालेल्य यशानंतर त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते.
[read_also content=”नुकतीच सुट्टी आटपून कर्तव्यावर जाताना भंडाऱ्यातील सुपुत्राचा आर्मी वाहन अपघातात दुर्दैवी मृत्यू com”]